Next
नीना कुलकर्णी होणार ‘स्वप्नील’च्या आई
‘मोगरा ‘फुलला’च्या निमित्ताने १४ वर्षांनंतर एकत्र येणार स्वप्नील जोशी आणि नीना कुलकर्णी
BOI
Wednesday, April 03, 2019 | 03:01 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : काही दिवसांपासून चर्चेत असलेला अभिनेता स्वप्नील जोशी याचा आगामी चित्रपट ‘मोगरा फुलला’ हा आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून हिंदी व मराठी चित्रपटांमधून भूमिका केलेल्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यादेखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. स्वप्नीलने नुकतेच चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले असून यात नीना कुलकर्णी दिसत आहेत.

श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात अभिनेत्री नीना कुलकर्णी स्वप्नीलच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. आई आणि मुलगा यांच्यातील एक निखळ, प्रेमाचे, मायेचे नाते दर्शवणारे असे ते पोस्टर स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ अशी एक ओळ स्वप्नीलने या पोस्टरसोबत लिहिली आहे.

नीना कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी यांच्यासह या चित्रपटात चंद्रकांत कुलकर्णी, साई देवधर, आनंद इंगळे, समिधा गुरू, संदीप पाठक, दीप्ती भागवत, सुहिता थत्ते, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे,  सानवी रत्नाळीकर, प्राची जोशी, आशिष गोखले, प्रसाद लिमये यांसारखी आणखी काही तगडी कलाकार मंडळी असणार आहेत. 

‘या चित्रपटाच्या निमित्ताने या सेटवर सर्व कलाकारांसोबत काम करताना मला खूप छान वाटत आहे. खरे तर श्रावणी देवधर माझी मैत्रीण असल्यामुळे मला हे काम करणे नवीन वाटले नाही. मोगरा फुलला ही एक संवेदनशील आणि भावनात्मक कथा आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत मी आधीही काम केले आहे, त्यामुळे सहजपणा आला. स्वप्नीसोबत तर मी तब्बल १४ वर्षांनी काम करत आहे. खूप जास्त उत्सुकता होती. चित्रपटाच्या निर्मात्यांचेही मी विशेष आभार मानेन’, अशा भावना नीना कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. 

१९७०मध्ये आपली अभिनयाची कारकीर्द सुरू केलेल्या नीनाताईंनी आपल्या या कारकार्दीत अनेक चित्रपट, व्यावसायिक नाटके केली आहेत. केवळ अभिनेत्री म्हणूनच न राहता, निर्माती-दिग्दर्शिका-स्तंभलेखिका म्हणूनही त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search