Next
सुरांच्या सम्राज्ञीचे ‘ठाकरी’ नृत्य
BOI
Friday, June 09, 2017 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

गायिका आशा भोसलेमुंबई : आशा भोसले हे नाव उच्चारले, की आठवतो तो मूर्तिमंत चैतन्याचा झरा... हा झरा वयाच्या ८३व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने खळाळतो आहे, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. गेली अनेक दशके आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या सुरांच्या सम्राज्ञीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. साडीचा पदर कमरेला खोचून ‘आम्ही ठाकर ठाकर..’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरल्याचे या व्हिडिओत दिसते आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर त्यांना हार्मोनियमसह गाणे गाऊन साथ करत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता, तरच नवल.

बॉलिवूडच्या चित्रपटांमधील विविध शैलींतील हजारो लोकप्रिय गाणी आशाजींच्या नावावर आहेत. आपल्या अष्टपैलू गायकीने त्यांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत. आपल्या सुरांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अवघ्या जगभरातील लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केले आहे. ‘आजा आजा..’, ‘दिल चीज क्या है..,’ ‘दे दे प्यार दे..’ गाण्यांपासून ते अलीकडील काळातील अनेक चित्रपटांतील त्यांची गाणीही तुफान गाजली. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत आशाजींनी पार्श्वगायन केले आहे. आजवर सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून त्या जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत १४ भाषांमधील सुमारे १२ हजार गाणी गायली आहेत.

याच आशा भोसले जेव्हा चक्क नाचू लागतात, तेव्हा सगळे थक्क होणारच.. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या  व्हिडिओमध्ये आशाताईंनी ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील, ‘आम्ही ठाकर ठाकर..’ या गाण्यावर ताल धरलेला दिसतो. ८३ वर्षांची गायिका इतक्या सुंदर पद्धतीने नाचू शकते यावर खरंच कोणाचा विश्वास बसणार नाही. त्यात पं. हृदयनाथ मंगेशकरही यात गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नक्की कोणत्या कार्यक्रमातील आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही; पण या वयातही या दोघा दिग्गज कलाकारांचा उत्साह पाहून रसिकांनी हा व्हिडिओ शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.  
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search