Next
अशोक समेळ करणार ‘मी अश्वत्थामा’चे अभिवाचन
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात १२ जानेवारीला आयोजन
BOI
Wednesday, January 09, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

अशोक समेळरत्नागिरी : महाभारतकालीन व्यक्तिरेखेवर सुमारे २०-२१ वर्षे सखोल चिंतन व अभ्यास करून लिहिलेल्या ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचन आणि ती लिहिताना आलेले अनुभव अशोक समेळ यांच्या स्वतःच्या शब्दांत आणि त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांच्या समवेत रत्नागिरीकरांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.

समेळ यांची गेल्या तीन वर्षांत पाचवी आवृत्ती निघालेली ही महाकादंबरी आहे. भारतीय आर्ष काळातील श्रीपरशुराम, श्रीहनुमान, बळीराजा, विभीषण, महर्षी व्यास, कृपाचार्य व युगात्मा अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव मानले जातात; पण अश्वत्थामाव्यतिरिक्त उरलेल्या सहा महापुरुषांचे चिरंजीवित्व हे त्यांना मिळालेले वरदान आहे. याउलट अश्वत्थामाचे चिरंजीवित्व हा त्याला मिळालेला दुर्धर शाप आहे, असे मानले जाते. अशा या महाभारतातील एका अनुल्लेखनीय व दुर्लक्षित खलात्म्यावर मराठीतून करुणामय व वात्सल्यमय लिखाणाचे धाडस समेळ यांनी केले आहे. त्यांनी या व्यक्तिरेखेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला.

सातपुडा पर्वतातील सर्वात पहिल्या आणि मोठ्या पर्वताचे नाव अस्तंबा आहे. (अस्तंबा पर्वताविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) या पर्वतावर आजही अश्वत्थामा राहतो, असे आदिवासी मानतात. त्याला आदिवासी देव मानतात. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ ही कादंबरी लिहित असताना नंदुरबार जिल्ह्यातील या गावात ते गेले, तेथील आदिवासींशी बोलले. तेथील प्रत्येक रिक्षावर अश्वत्थामा असे लिहिलेले त्यांना दिसले. तिथे त्याचे मंदिरही आहे; तसेच धनत्रोदयशीला तेथे मोठी यात्रा भरते. देशभरातून लोक येतात, अशी खूप रोचक माहिती या कांदबरीचे लेखन करताना मिळाल्याचे समेळ यांनी सांगितले.

महाभारतात उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली. संदर्भ ग्रंथ, विष्णुपुराण, रुद्रपुराण, महाभारताचे १८ खंड अशा सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. या कांदबरीत अश्वत्थामा त्यांनी आहे तसाच मांडला आहे.

हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शनिवार, १२ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
स्थळ : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे सभागृह, जयस्तंभ, रत्नागिरी.

(‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search