Next
शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाची कार्यशाळा उत्साहात
BOI
Tuesday, June 18, 2019 | 12:09 PM
15 0 0
Share this article:


कल्याण : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्षांची राज्यस्तरीय कार्यशाळा कल्याण पंचायत समिती हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्षपद मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे यांनी भूषविले. 

शिक्षकांच्या साहित्य, कला, क्रीडा या गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी, प्रसिद्धी देण्यासाठी आणि शिक्षकांना राज्य पातळीवरच नाही, तर देश पातळीवर प्रतिनिधित्व करता यावे यासाठी ही नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरे यांनी दिव्यात तेल असेल, तरच तो दुसऱ्यास प्रकाश देऊ शकतो या उक्तीप्रमाणे शिक्षक परिपूर्ण असेल, तरच विद्यार्थ्यांचा विकास साधला जाऊ शकत असल्याचे सांगितले. 

कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून मंडळाचे कोकण विभागीय अध्यक्ष प्राचार्य संतोष लुले यांनी संघटनेप्रती माझे कर्तव्य, राष्ट्रपती पारितोषिक विजेते डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापूर) यांनी ‘संघटन कौशल्य’, प्रा. संपत गर्जे (पुणे) व मंडळाच्या राज्य परीक्षण समितीचे प्रमुख प्रकाश साखरे (कोल्हापूर) यांनी ‘जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी’ या विषयी, नरेश वाळंज यांनी ‘संघटनात सोशल मीडियाचा वापर’ या विषयी अभ्यासपूर्वक विवेचन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. राज्य उपाध्यक्षा शालिनी मेखा यांनी दीपगीत सादर केले. प्रास्ताविक करताना राज्य सचिव विजय जोगमार्गे यांनी संस्थेची आजपर्यंतची वाटचाल स्पष्ट केली. या वेळी कोकण विभागीय अध्यक्ष प्राचार्य संतोष लुले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश साखरे, मुंबई जिल्हा शालिनी मेखा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जया नेरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. संपत गर्जे, ठाणे जिल्हाध्यक्ष हर्षल साबळे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मिताली तांबे, सांगली जिल्हाध्यक्ष सचिन कुसनाळे, लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. कल्याण राऊत, पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. विवेक कुवरा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आदवडे यांच्यासह राज्यातील अनेक जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांना नियुक्तीपत्र व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्हा सचिव शाम मोराणकर यांनी सूत्रसंचालन केले. ठाणे जिल्हाध्यक्ष हर्षल साबळे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search