Next
श्रीअक्कलकोटस्थ स्वामी चरित्र + संक्षिप्त श्रीशंकर गाथा
BOI
Monday, April 23 | 10:40 AM
15 0 0
Share this story

‘यह दुनिया में कई रंग अशा है, यह रंग निराला है’ अशा सर्वांपेक्षा निराळ्या श्रीशंकर महाराजांचे हे चरित्र विवेक दिगंबर वैद्य यांनी लिहिले आहे. महाराजांना एक न सुटलेले कोडे समजले जाते. या आजानुबाहु सिद्धपुरुषाला कळीकाळाची तमा नसे. महाराजांच्या व्यक्ती वैशिष्ट्याप्रमाणेच अनेक आख्यायिका पुस्तकात वाचायला मिळतात. एवढेच नव्हे, तर समाधी व त्या पश्चात घडलेल्या लीलांची माहितीही मिळते.

‘श्री अक्कलकोटस्थ स्वामी चरित्र’ हे दुसरे पुस्तक (कै.) नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागात महाराजांचा स्वभाव वर्णिला आहे, तर दुसरा भाग अद्भुत चमत्कारांचा आहे. पहिल्या भागात तत्कालीन स्थिती आणि समाजमनाची ओळखही होते. अक्कलकोट येथील वास्तव्याविषयी माहिती मिळते. या पुस्तकात चरित्राच्या इंग्रजीत भाषांतराचाही समावेश आहे.

प्रकाशक : पुनर्वसू प्रकाशन
पाने : २३२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link