Next
‘डीकेटीई’मध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’मध्ये मतदान जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हातकणंगलेचे तहसीलदार सुधाकर भोसले. शेजारी मान्यवर.

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’मध्ये दिल्लीतील भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा मतदार यादीत समावेश व्हावा व त्यांचा मतदार प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रश्‍ननियमावली, पोस्टर प्रेझटेंशन आयोजित करून लोकशाही व मतदारांच्या सहभागचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

मतदान समजावून सांगण्यासाठी प्रत्यक्ष ईव्हीएस मशीनवर प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मतदानाचे प्रात्यक्षिक करून पाहिले आणि मतदान यंत्रणा समजून घेतली. या वेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी पारदर्शी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रतिज्ञा केली. यापुढील लोकसभा व विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत इव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. यासंदर्भातही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून त्याची सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रारंभी डिप्लोमा इनचार्ज प्रा. सी. आर. साधले यांनी कार्यक्रमामागचा उद्देश व्यक्त केला. त्यानंतर हातकणंगलेचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी ‘मतदान पद्धती’ यावर मार्गदर्शन केले. या वेळी इचलकरंजीचे मंडल अधिकारी प्रणाम भगले, इचलकरंजी सर्कलचे तलाठी सुनील खामकर, कबनूरचे तलाठी अनंत दांडेकर, मतदार सहायक कक्ष अधिकारी आनंद धस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अवधूत जाधव यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link