Next
‘लोकसहभागातून नद्या जलपर्णीमुक्त करणे शक्य’
पर्यावरणप्रेमी प्रदीप वाल्हेकर यांचे व्याख्यान
प्रेस रिलीज
Friday, December 14, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

पवना नदी

पुणे : ‘आपल्या देशातील सर्व नद्या जलपर्णी वनस्पतीने भरल्या आहेत. यामुळे एका बाजूला नदी पात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे डासांची संख्या वाढत आहे. जलपर्णी निर्मुलन हा मोठा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे. फक्त कंत्राटे देऊन जलपर्णी नदीतून पुढे ढकलली जाते; पण नष्ट होत नाही. आम्ही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन रोटरी आणि लोकसहभागातून जलपर्णीमुक्त स्वच्छ सुंदर पवनामाई हे जीवनध्येय मानून अभियान सुरू केले आहे,’ असे पर्यावरणप्रेमी प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले.

जीविधा, निसर्गसेवक व देवराई फाऊंडेशन या संस्थांच्या वतीने ‘जलपर्णीमुक्त, स्वच्छ सुंदर पवनामाई अभियान’ या विषयावर वाल्हेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. हे व्याख्यान १२ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात झाले.  

मार्गदर्शन करताना प्रदीप वाल्हेकरवाल्हेकर म्हणाले, ‘स्वतःच्या खिशातून लाखो रुपये घालून आम्ही पवना नदी जलपर्णीमुक्त करण्याचे काम करत आहोत. नदी स्वच्छ, प्रवाही, निर्मळ ठेवण्याच्या प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांची फौज याकामी उभी राहिली आहे. जलपर्णी पक्व होण्याआधीच काढली, तरच ती परत परत येणार नाही हे या अभियानाचे सूत्र आहे. जलपर्णीचे पुनरुत्पादन चक्र तोडणे हाच एकमेव उपाय आहे. पाण्यातील जलपर्णीला फुले, फळे आली, की हजाराच्या पटीत बिया नदीत पसरून जलपर्णीची भयानक वाढ होते आणि नदीचे पात्र भरून जाते. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि पवनेच्या काठच्या गावांना तेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी खर्च करावा लागतो.’

वाल्हेकर यांनी या मोहिमेची माहिती व्याख्यानातून देतानाच जलपर्णी नष्ट करण्याच्याबाबतीत पालिका, प्रशासन, गावकरी यांच्यात जागृती घडवून एकत्रित कामाची गरज असल्याचे वाल्हेकर यांनी सांगितले. पवनेपाठोपाठ इंद्रायणी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जीविधा 'चे संचालक राजीव पंडित, उष:प्रभा पागे, शैलेंद्र पटेल यांसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 106 Days ago
Such activity will be helpful in many ways . How much of effort is going into it ? Politics need not come into it . It will benefit everybody .
0
0

Select Language
Share Link
 
Search