Next
‘जॉन्सन अँड जॉन्सन’तर्फे वार्षिक अहवालाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 04:04 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सनतर्फे २०१७चा वार्षिक अहवाल ‘हेल्थ फॉर ह्युमॅनिटी’ प्रकाशित करण्यात आला असून, तो सर्वांसाठी उत्तम आरोग्य या कंपनीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला पुढे नेण्यासाठी त्याच्या सामाजिक, पर्यावरणीय आणि शासनाला असलेल्या वचनबद्धतांकडे त्यांचा दृष्टीकोन आणि लक्षणीय प्रगतीचे प्रात्यक्षिक करत आहे.

हा अहवाल ट्युबरक्युलोसीससारख्या (टीबी) गंभीर आजाराचे निर्मूलन करणे, मातेच्या आणि नवजात बाळाच्या निगेमध्ये प्रगती करणे अशा देशाच्या प्रयत्नांचे समर्थन करण्यावर विशेष लक्ष देण्यासह जॉन्सन अँड जॉन्सनच्या भारतामधील अग्रणी सार्वजनिक आरोग्य उपक्रम आणि कामाची विविधता आणि समावेश सुधारण्याकडे कंपनीच्या उपक्रमांना अधोरेखित करत आहे.

याबाबत जॉन्सन अँड जॉन्सनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलेक्स गॉर्स्काय म्हणाले, ‘पुढील पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक आरोग्यकारक असेल याची खात्री करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन दररोज कार्यरत आहे. आमचे कार्य आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी आहे आणि आम्ही अजूनही कार्य पूर्ण झालेले नाही या स्मरणपत्राकडे पाहून सेवा देत असतो. आम्ही आमच्यासाठी आणि व्यापक प्रमाणात आरोग्यनिगा उद्योगासाठी पायंडा नेहमीच उंचावत रहायला हवे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आणि सर्वत्र मनात जागा मिळवणे पुढेही सुरू ठेवू शकतो.’

भारतामधील उपक्रमांवरील प्रगती दर्शवताना, जॉन्सन अँड जॉन्सन इंडियाच्या औषधनिर्माण विभाग, जानसेनचे व्यवस्थापकीय संचालक संजीव नवंगुळ म्हणाले की, ‘सत्तरपेक्षा जास्त वर्षांपासून, जगभरामध्ये मानवतेसाठी आरोग्याची खात्री करण्याच्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या प्रयत्नांमध्ये भारत हा महत्त्वाचा  भाग राहिला आहे. रुग्ण आपली प्रतीक्षा करत आहेत आणि आता गमावण्यासाठी वेळ नाही या विश्वासाने आम्ही पुढे सरसावत असतो आणि हा अहवाल आम्ही गेल्या वर्षी केलेल्या प्रगतीला अधोरेखित करतो. भारताच्या मोठ्या आरोग्यविषयक आव्हानांचे निराकरण करण्यास आमच्या सखोल वचनबद्धतांना दर्शवतो.’

घोषणेच्या वेळी बोलताना जॉन्सन अँड जॉन्सन इंडियाचे, ग्राहक, व्यवस्थापकीय संचालक विकास श्रीवास्तव म्हणाले की, ‘आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया आमच्या कर्मचार्‍यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याला आधार देण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही कुटुंबाला-अनुकूल धोरणे सादर केली आहेत जी कर्मचार्‍यांना कुटुंब आणि कामाचे सहजपणे संतुलन राखण्यास आणि त्यांच्या जबाबदार्‍या पूर्ण करणे शक्य करते. आम्ही सहा वर्षांपूर्वी अशा पहिल्या सघटनांपैकी एक होतो, ज्यांनी नव्या मातांसाठी २६ आठवड्यांची मॅटर्निटी सुट्टी ऑफर केली होती. ऑगस्ट २०१७मध्ये, पॅरेंटल लीवचे नवीन जागतिक मानक सादर केले, जेथे भारतासह जगभरातील पालक बाळाचा जन्म किंवा ते दत्तक घेतल्यास किमान आठ आठवड्याचे पेड पॅरेंटल लीवसाठी पात्र ठरतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link