Next
‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’
प्रेस रिलीज
Friday, May 26, 2017 | 06:26 PM
15 0 0
Share this article:

कोल्हापूर : ‘सामाजिक समस्यांची जाण असल्याने संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडून त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच दिल्ली दरबारात कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. बास्केट ब्रिज, रेल्वे स्टेशन, विमानतळ, कोकण रेल्वे यांसह जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. यापुढील काळातही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. 

पन्हाळा तालुक्यातील यवलूज, पडळ, माजगाव-माळवाडी, शिंदेवाडी आणि महाडिकवाडी या गावांत खासदार निधीतून उभारलेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील यवलूज, माजगाव, माळवाडी, शिंदेवाडी, महाडिकवाडी येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून साकारलेल्या रस्ते, तालीम, संगणक कक्ष अशा विविध विकासकामांचं उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यवलूज येथील बेघरवाडी इथं काँक्रिट रस्त्यासाठी पाच लाख, माजगाव-माळवाडी येथे शिवाजी तालीम मंडळाच्या इमारतीसाठी सात लाख, शिंदेवाडी हायस्कूलला संगणक कक्षासाठी सात लाख, शिंदेवाडी येथील नवीन वाढीव वसाहतीसाठी काँक्रिटच्या रस्त्यासाठी तीन लाख आणि महाडिकवाडी येथील  रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या सर्व कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील भौतिक सुविधा साकारण्याबरोबर, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून, संसदेत सर्वाधिक प्रश्नांची मांडणी केल्यामुळे ‘नंबर वन’चा खासदार म्हणून निवड झाली असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. 

येत्या २७ मे रोजी खासदार महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार मिळणार असल्याने त्यांचा विशेष सत्कार विविध गावांत करण्यात आला. या दौऱ्यामध्ये ‘कुंभी’चे संचालक राजाराम शिंदे, ‘कुंभी’चे माजी व्हाइस चेअरमन पांडुरंग काशीद, पंचायत समिती सदस्य पांडुरंग खाटकी, सरपंच रूपाली पाटील, संतोष पाटील, जी. डी. पाटील, वसंत भोमकर, संताजी सावंत, सुरेश भोमकर, महादेव पवार, तुकाराम चोपडे, मारुती जगताप, महाडिकवाडीचे उपसरपंच आनंदा जांबिलकर, महेश गुरव, संदीप महाडिक, गणपती जांबिलकर, गणपती महाडिक, आनंदा पाटील, रोहन गुरव, अनिल पाटील, विक्रम खोत, बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search