Next
‘रोश’कडून ‘एनएटी पीसीआर’च्या वापराला प्रोत्साहन
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 05:15 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतात रक्ताचा तुटवडा असल्याची विलक्षण स्थिती असतानाच संक्रमित केलेल्या रक्तातून होणाऱ्या जंतूसंसर्गामुळे (ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड इन्फेक्शन– TTIs) रुग्णांना पूर्णपणे बरे करण्याचे आव्हान असते. रुग्णाला चांगल्या दर्जाचे रक्त दिले जाईल याची हमी देणे महत्त्वाचे ठरते. जगभरात न्यूक्लिक अॅसिड चाचणी (NAT) करण्यावर भर दिला जात असल्याने देशभरातही रक्तसंक्रमण प्रक्रियेत अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, याबाबत सकारात्मक मागणी होत आहे.

एनएटी पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (पीसीआर) चाचणीमुळे रक्तदात्याकडून घेतलेल्या रक्तात जंतूसंसर्ग आहे का, याचे वेळीच निदान होते, ज्यामुळे रक्ताची सुरक्षितताही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ऐनवेळी रक्तदान करणाऱ्यांच्या तुलनेत ऐच्छिक रक्तदान करणाऱ्यांमध्ये ‘टीटीआय’चे प्रमाण कमी असते. ‘जागतिक रक्तदाता दिना’च्या निमित्ताने जास्तीत जास्त ऐच्छिक रक्तदात्यांची तातडीची निकड आहे तसेच एनएटी पीसीआर यासारख्या अतिशय सुरक्षित साधनांचा वापर झाला पाहिजे, हे अधोरेखित करणे गरजेचे आहे.

हेपिटायटिस बी (HBV), हेपिटायटिस सी (HCV) आणि एचआयव्ही यांचा प्रभाव देशात अनुक्रमे चार टक्के एक, एक टक्का एक आणि ०.२६ टक्का दोन आहे. केवळी ७० टक्के दोन एचआव्ही बाधितांना आपल्याला काय आजार आहे, याची जाणीव आहे आणि वेळीच याचे निदान झाल्यानंतर लाखोंचे प्राण वाचू शकतात. एनएटीचा अवलंब केल्यास अशा प्रकारचे संसर्ग तसेच संक्रमित केलेल्या रक्तातून होणाऱ्या जंतूसंसर्ग (TTIs) आणि त्यामुळे उद्भवणारे विकार आणि मृत्यू यांचे प्रमाण कमी होऊ शकते. याशिवाय, टीटीआयमुळे होणारा रुग्णालयाच्या आणि उपचाराच्या खर्चाचा भार रुग्ण आणि सरकारवर पडत नाही.

भारतात एचबीव्ही, एचआयव्ही आणि एचसीव्हीच्या रुग्णांसाठी रक्ताची सेरॉलॉजिकल चाचणी करणे अनिवार्य आहे. तर, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील एचआयव्ही १/२ आणि एचसीव्हीच्या रुग्णांसाठी रक्ताची एचबीएसएजी (HBsAg) आणि अँटिबॉडिज् चाचणी करणे बंधनकारक आहे. सेरोनॉनरिअॅक्टिव्ह रक्तदानामुळे ‘टीटीआय’च्या संक्रमणाचा धोका वाढतो. हे ध्यानी घेता सुरक्षित रक्तासाठी योग्य त्या चाचणीची अत्यंत आवश्यकता आहे. देशामध्ये जेथे एनएटीचा अवलंब केला जातो तिथे गेल्या दोन ते तीन दशकांत हा धोका लक्षणीय प्रमाणात घटला आहे. एनएटी पीसीआरबाबत जागृती होत असली तरी, एकूण ११.६ दशलक्ष रक्तदानापैकी केवळ नऊ टक्के रक्ताची एनएटी केली जाते. ‘टीटीआय’च्या तपासणीसाठी सध्या आपल्या देशात एनएटीची सक्ती नाही.

एनएटी पीसीआरमुळे एचआयव्ही, हेपिटायटिस बी आणि हेपिटायटिस सी यांचा फैलाव करणाऱ्या विषाणूंचे अस्तित्व (आरएनए आणि डीएनए) थेट शोधून काढले जाते. रक्तदात्याकडून मिळालेल्या रक्तातील संसर्ग शोधून काढण्यासाठी एनएटीचा प्रभावीपणे वापर करता येतो आणि हे तंत्रज्ञान जगभरात उपलब्ध आहे. या अत्याधुनिक रक्तचाचणीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, कमी कालावधी लागत असल्याने एनएटी पीसीआरचा सल्ला देणे उचित ठरते. नेहमीच्या बंधनकारक असलेल्या एन्टिजेन/ अँटिबॉडी चाचणीमुळे वेळ लागत असल्याने दरम्यानच्या काळात रुग्णाला संसर्गाचा धोका वाढतो. एनएटी पीसीआरमार्फत निदान करण्यासाठी कमी वेळ लागतो तसेच एनएटी चाचणी केलेल्या रक्तामुळे रुग्णांच्या दृष्टीने टीटीआयचा धोकाही कमी होता.

रोश डायग्नॉस्टिक्स इंडियाचे मेडिकल अॅंड सायंटिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. संदीप सेवलीकर म्हणाले, ‘कोणत्याही प्रकारच्या रक्तसंक्रमणादरम्यान सुरक्षितता ही मूलभूत गरज आहे, असे आमचे ठाम मत आहे. सुरक्षित रक्त संक्रमणामुळे चांगल्या दर्जाचे उपचार आपल्याला मिळेल, असे मानसिक समाधान रुग्णाला देता येते. रोशमध्ये आम्ही भारतीय बाजारपेठेत रक्तचाचणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. रक्तदानादरम्यान कमी कालावधीत होत असलेल्या एनएटी पीसीआर चाचणीमुळे टीटीआयचा धोका कमी होऊ शकतो, याचा आम्हाला विश्वास आहे.’

रोश डायग्नॉस्टिक्स इंडिया ही देशातील आघाडीची इन-व्हिट्रो डायग्नॉस्टिक्स (आयव्हीडी) आहे. जानेवारी २००२मध्ये स्थापन झालेली ही कंपनी निदान चाचणी पुरविते. जेणेकरून रोगाची वेळीच निदान, तपासणी आणि देखरेख करणे शक्य होते. ‘रुग्णाला पुढे काय हवे आहे, ते आत्ताच उपलब्ध करतो’ या तत्त्वावर काम करत असून, अशा प्रकारे भारतातील आगामी आरोग्यसेवांसाठी ‘रोश’ची तयारी सुरू असते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link