Next
‘अनाज इंडिया’च्या पुरस्काराने रावसाहेब पुजारी यांचा गौरव
गुजरातच्या राज्यपालांच्या हस्ते सन्मान
BOI
Tuesday, September 10, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:

रावसाहेब पुजारी यांचा गौरव करताना गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, शेजारी आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यास व रमेश संन्याल.

कोल्हापूर : कृषी पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांचा ‘अनाज इंडिया’ या संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गांधीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुजारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘असोसिएशन ऑफ नॅशनल अॅग्रिकल्चरल जर्नालिस्ट्स’ (अनाज इंडिया) ही देशातील कृषी पत्रकारांची संघटना आहे.

कार्यक्रमाला ‘अनाज इंडिया’चे अध्यक्ष गजानन गिरोलकर, जैन इरिगेशनचे सीईओ अनंत बागुल, आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यास उपस्थित होते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कृषी पत्रकारांचे चौथे अधिवेशन गुजरातची राजधानी गांधीनगर येथील महात्मा मंदिरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत प्रमुख पाहुणे होते, तर विविध कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. 
या वेळी राज्यपालांनी सेंद्रिय शेतीतील त्यांचे अनुभव कथन करून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कृषी पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या वेळी चार राज्यांतील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व कृषी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोल्हापुरातील रावसाहेब पुजारी गेली ३५ वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध दैनिकांत विविध पदांवर काम केले आहे. गेली १७ वर्षे ते शेती-प्रगती मासिक चालवितात. त्यांनी शेतीसंबंधी सहा पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा शेतीमित्र पुरस्कार व सीएससीच्या फेलोशिपसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search