Next
नाना पाटेकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार गौरव!
BOI
Monday, February 13, 2017 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

ग्रामीण स्नेह फाउंडेशनच्या ‘बिहार एक विरासत’ या उपक्रमाअंतर्गत प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवामध्ये देशविदेशातील जवळपास ३००० पेक्षा जास्त चित्रपट दाखविले जातात. इराण, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, बांग्लादेश, कॅनडा, पोर्तुगाल, ऑस्ट्रीया, रशिया, ब्राझील, मेक्सिको आणि अशा विविध देशांतील चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतात. विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट, लघुपट आणि माहितीपट या महोत्सवामध्ये प्रेक्षकांना दाखविण्यात येतात.

भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मानाचं नाव म्हणजे अभिनेता नाना पाटेकर. विविध धाटणीच्या चित्रपटांतून दर्जेदार अभिनयाचा नजराणा सादर करणाऱ्या नाना पाटेकर यांना जीनवगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (बिफ) मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आजवर दिलेल्या योगदानाबद्दल नानांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘नाना पाटेकर यांच्या समाजकार्यामुळे आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेल्या योगदानामुळे त्यांना ‘बोधिसत्व व्हॉइस ऑफ चेंज लाइफटाइम अचिव्हमेंट’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे’, असे वक्तव्य ग्रामीण स्नेह फाउंडेशन आणि बिफच्या आयोजिका स्नेहा रौत्रे यांनी पुरस्कार जाहीर करते वेळी केले.

यंदाच्या या बोधिसत्व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केतन मेहता, महेश भट्ट, अदूर गोपालक्रिष्णन, शत्रुघ्न सिन्हा, श्याम बेनेगल, स्वरा भास्कर या मान्यवकरांची उपस्थिती असणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता नाना पाटेकर हे अभिनयाचं चालतं-फिरतं विद्यापीठ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. नानांनी आजवर बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांसोबतच काही चौकटीबाहेर जाणाऱ्या चित्रपटांमध्येही काम करत काही आव्हानात्मक भूमिकांना पडद्यावर जिवंत केले आहे. त्यामुळे सतत आव्हानं पेलणाऱ्या या कलाकाराचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search