Next
न्यूझीलंडच्या माइक बटलर यांची भारतात ‘दानयात्रा’
पालघर जिल्ह्यातील शाळांच्या मदतीसाठी उपक्रम
BOI
Monday, December 03, 2018 | 06:27 PM
15 0 0
Share this story

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी भारतात दानयात्रा काढणारे न्युझीलंडचे माइक बटलर आणि पंकज आंबवणे.

मुंबई : आदिवासी भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी न्यूझीलंडमधील ‘दानयात्रे’साठी प्रसिद्ध असणारे माइक बटलर यांनी तीन डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालवधीत मुंबई- पुणे- नाशिक-वाडा अशी ५७० किलोमीटरची दानयात्रा काढली असून, दादरमधील महापौर बंगल्यापासून, सोमवारी, तीन डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे आठ वाजता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी झेंडा दाखवल्यानंतर ही यात्रा सुरू झाली. या यात्रेत न्यूझीलंडमध्ये कार्यरत असणारे आयटी अभियंता पंकज आंबवणे आणि सहकारी आहेत. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत, माजी उपमहापौर अरुण देव आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. पत्रकार महेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने ही यात्रा होत असून, पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पाच शाळांना संगणक, खेळाचे साहित्य आदी शैक्षणिक मदत करण्यात येणार आहे. 

याबाबत महेश म्हात्रे म्हणाले, ‘बटलर न्यूझीलंडमध्ये दानयात्रेत चालत असताना त्यांच्या संस्थेच्या खात्यात ऑनलाइन मदत जमा होते. भारतात होणारा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्याला लोकांनी पाठिंबा दिला, तर आपल्या समाजात एक चांगला पायंडा पडेल.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link