Next
शि. म. परांजपे
BOI
Wednesday, June 27, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

‘काळ’कर्ते हीच ज्यांची ओळख बनली त्या शि. म. परांजपे यांचा २७ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
..... 
२७ जून १८६४ रोजी महाडमध्ये जन्मलेले शिवराम परांजपे हे पत्रकार, कथाकार आणि निबंधकार म्हणून प्रसिद्ध होते. संस्कृतसाठीची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे ते पहिलेच मानकरी होते! त्यांच्या लेखनावर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा प्रभाव होता. 

पुढे प्राध्यापकी चालू असताना त्यांनी लोकमान्य टिळकांचं शिष्यत्व पत्करलं. वयाच्या ३४व्या वर्षी, २५ मार्च १८९८ रोजी त्यांनी ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू केलं. ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशी त्याची जाहिरात केली गेली होती. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्यं होती, असं म्हटलं गेलंय. भारतीय स्वातंत्र्यासाठी स्फुल्लिंग चेतवणारे आणि प्रखर देशभक्ती जागवणारे निबंध लिहून ब्रिटिशांना धडकी भरवली होती. उपहासगर्भ लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य! त्याच लेखांच्या आधारे ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला होता. आकारलेला प्रचंड दंड भरणं शक्य नसल्याने १९१०मध्ये ते वृत्तपत्र बंद पडलं.

‘विष्णुसहस्रनाम’ या लेखात सत्तावीस ओळींचं आणि दोनशेतीस शब्दांचं प्रदीर्घ वाक्य त्यांनी रचलं होतं. १९२९ साली बेळगावमध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास, तर्कभाषा, तर्कसंग्रहदीपिका, पूर्वमीमांसेवरील अर्थसंग्रह हे संस्कृताधारित ग्रंथ, भामिनीविलास, प्रसन्नराघव, प्रतिमा यांच्या संपादित आवृत्त्या, मोरोपंतांच्या आर्याभारताची प्रस्तावना, रूसोचे राजनीतिशास्त्र (अपूर्ण ग्रंथ), गोविंदाची गोष्ट, विंध्याचल, रामदेवराव, पहिला पांडव, अहल्याजार  असं त्यांचं विपुल लेखन प्रसिद्ध आहे.

२७ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(शि. म. परांजपे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search