Next
शिक्षक व मदतनीसांसाठी प्रशिक्षण परिषद
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this story

​​पुणे : प्री-स्कूल आणि पाळणाघरात काम करणाऱ्या शिक्षकांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते; परंतु अनेकदा ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित राहते. ही गरज ओळखून ‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’ (ईसीए) या संस्थेतर्फे लहान मुलांच्या शिक्षकांसाठी खास प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘पुणे इंटरनॅशनल अर्ली चाईल्डहूड एज्युफेस्ट’ (पीआयईसीई) असे या परिषदेचे नाव अहे. चार दिवसांची ही परिषद २८ जून ते एक जुलै या कालावधीत सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर्समध्ये ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर’ (एमसीसीआयए) येथे चालणार आहे. पुण्यात एक हजार २००हून अधिक प्री-स्कूल आणि पाळणाघरे असून, या परिषदेत जवळपास एक हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे ‘अर्ली चाईल्डहूड असोसिएशन’चे लक्ष्य आहे.    

प्री-स्कूल आणि पाळणाघरात काम करणारे शिक्षक, मुलांची काळजी घेणाऱ्या ताई, मदतनीस, सफाई कर्मचारी, मुलांना प्री-स्कूलमध्ये सोडणाऱ्या बसचे चालक आणि अगदी शाळेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता भासते. अलीकडे ठिकठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी घडलेल्या काही घटनांमुळे मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षित असण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या परिषदेत संस्थेच्या अध्यक्ष स्वाती वत्स या प्री-स्कूल व पाळणाघरांमधील मदतनीसांसाठी विशेष सत्र घेणार आहेत.

वत्स म्हणाल्या, ‘प्री-स्कूल, नर्सरी आणि पाळणाघरात जाणाऱ्या मुलांना सुरक्षित वातावरण मिळावे, तेथील शिक्षक व मदतनीसांनी त्यांची उत्तम काळजी घ्यावी आणि त्यांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीस चालना कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. असे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या ‘अर्ली चाईल्डहूड एज्युफेस्ट’मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक धडे देणार आहेत. चार दिवसांच्या या परिषदेत एकूण ४० कार्यशाळा होणार असून, परिषदेत सहभागी होण्यासाठी माफक शुल्क आहे.’

संस्थेच्या पुणे शाखेचे क्षेत्र प्रमुख आदित्य तापडिया म्हणाले, ‘आम्ही या क्षेत्रातील प्रशिक्षक व कार्यकर्त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांची परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षकांनीही या कामासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही.’

‘अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन’विषयी (ईसीए) :
‘अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन’ या संस्थेची स्थापना स्वाती पोपट यांनी जून २०११मध्ये मुंबई येथे केली. वत्स या पोद्दार एज्युकेशन या संस्थेच्याही अध्यक्ष आहेत. प्री-स्कूल शाळा, प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संस्थेने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. संस्थेचे सहा हजार सदस्य असून, लहान मुलांना शिकवणाऱ्या व सांभाळणाऱ्या व्यक्तींच्या प्रशिक्षणासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link