Next
‘उद्योजकतेची कास धरा’
खासदार आढळराव पाटील यांचे आवाहन
BOI
Monday, November 05, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this story

ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमध्ये सहभागी कलाकारांचा सत्कार करताना खा. आढळराव पाटील,रवींद्र धारिया आणि संजय यादवराव

पुणे : ‘मुंबई घडविण्यात कोकणवासियांचा खूप मोठा वाटा असला, तरी आज कोकणी माणसाची जागा अन्य राज्यातील माणसांनी घेतली आहे. छोटी कामे करण्यास कमीपणा न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. मराठी माणसाने उद्योजकतेची कास धरली पाहिजे’, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. सातव्या ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ चा समारोप खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील यांच्या उपस्थितीत झाला . त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’चे संयोजक आणि ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’चे प्रमुख संजय यादवराव होते.

समारोप समारंभ रविवारी,चार नोव्हेंबर रोजी मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर येथे झाला. या वेळी माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया , ‘हिरवळ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष किशोर धारिया, या फेस्टिव्हलचे सहसंयोजक एक्झिकोन ग्रुपचे प्रमुख एम . क्यू . सय्यद, उद्योजक रामदास माने आदी मान्यवर उपस्थित होते .

एक ते चार नोव्हेंबरदरम्यान झालेल्या हा फेस्टिव्हलमध्ये  कोकणातील उद्योग, पर्यटन, कला, संस्कृती, स्वयंरोजगार  यांची ओळख घडवणारे प्रदर्शन, चर्चासत्रे, फॅशन शो इत्यादी कार्यक्रम झाले.  

आढळराव पाटील पुढे म्हणाले, ‘कोकणातील सर्व उद्योजकांना एकत्र करून आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल भरवून मोठे ग्लोबल मार्केट संयोजकांनी उपलब्ध करून दिले आहे . हा उल्लेखनीय प्रयत्न आहे. भारताची औद्योगिक राजधानी मुंबईवर कोकणी माणसाचे वर्चस्व होते,आता मात्र ही पकड निसटत असून, बिहारी, राजस्थानी माणसांची संख्या वाढत आहे. मराठी माणूस छोटी कामे करण्यास कमीपणा वाटून घेत असल्यास तो न मानल्यास भविष्यात त्यातूनच मोठा उद्योजक घडू शकतो. त्यामुळे आता उद्योजकतेची कास धरली पाहिजे.’

‘कोकणाचा विकास होताना शहरात आलेले कोकणवासीय पुन्हा कोकणात जाऊन आपला आणि प्रदेशाचा उत्कर्ष साधतील तो खरा सुदिन म्हणावा लागेल’, असे मत  वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.

‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हलच्या निमित्ताने पुण्यात कोकणविषयक काम करणाऱ्या ३०० संस्था एकत्र आल्या ,हे मोठे यश आहे. येत्या मार्चमध्ये एक हजार कोकणी उद्योजकांची परिषद पुण्यात आयोजित केली जाणार आहे’, अशी माहिती संजय यादवराव यांनी या वेळी दिली.

फेस्टिव्हलमध्ये सहभागी उद्योजक, कलाकार ,हितचिंतकांचा  खासदार आढळराव -पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एम . क्यू . सय्यद यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link