Next
ठाण्यात संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे आयोजन
BOI
Wednesday, December 12, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे ११ ते १४ जानेवारी २०१९ या कालावधीत ठाण्यातील उपवन सरोवाराशेजारील प्रांगणात संस्कृती आर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. गेली चार वर्षे संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत या कला महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.  

याबाबत बोलताना संस्कृती आर्ट्स फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले, ‘समाजात उत्तमरीतीने राबविल्या जाऊ शकतील अशा सामाजिक कल्पनांना रुजवणे आणि आपल्या संपन्न अशा कला आणि निर्मिती क्षेत्राचा वारसा पुढे नेणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. यंदा महोत्सवाचे पाचवे वर्ष असून, यावर्षी ‘पर्यावरण रक्षण’ हा विषय घेण्यात आला आहे. या माध्यमातून प्लास्टिकविरोधी चळवळ उभी राहावी, तसेच पुनर्विचार, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि नकार यामधून आपल्या मानसिकतेत बदल घडवून शाश्वत भविष्याकडे बघावे हा विचार जनतेला देण्यात येणार आहे.’

महोत्सवाचे कार्यकारी अध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले, ‘या वर्षीचे अभियान हे प्लास्टिक प्रदूषण व्याप्ती आणि आघात यांच्याबद्दल आहे. महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण याबाबत प्रात्यक्षिकातून जनजागृती केली जाणार आहे. या वर्षीच्या महोत्सवातील व्यासपीठावरून अनेक विषयांवर चर्चा होणार आहे.’
 
महोत्सवाचे सचिव मनोज पिल्ले म्हणाले, ‘दर वर्षीप्रमाणे याही वर्षी या महोत्सवात दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये त्यात सुप्रसिद्ध संगीतकार दर्शन रावल, मित ब्रदर्स, गझलनवाज जसविंदर सिंग, इंडो-किवी यूट्यूब ग्रेट शरले सेटीया यांचा समावेश असेल. देश-विदेशांतील ६००हून अधिक प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.’

कार्यकारीणी उपाध्यक्ष अरुण कुमार सुवर्णा म्हणाले, ‘संस्कृती आर्टस् फेस्टिवल हा आता सर्वात मोठा कलामहोत्सव ठरत आहे. यामध्ये दिग्ग्ज कलाकारांची उपथिती आणि सादरीकरण आजच्या तरुण कलाकारांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. यामधून भारताचा कला वारसा पुढे जाणार आहे. या कलामहोत्सवामुळे एक नवी अनुभूती प्रत्यकाला प्रदान करण्यासाठी महोत्सवाच्या सहसचिव सुमन विजयकार आणि त्यांचा निष्णात चमू यंदाही संस्कृती आर्टस् फेस्टिवलच्या यशासाठी सिद्ध आहे.’

कलाकारांसोबतच महोत्सवात इतर अनेक कलाकारांची दालने आपले लक्ष वेधून घेतील. यात भारतीय हस्तकला, खाद्य पदार्थ, प्रकाश आणि लेझर शो, हस्तकला कार्यशाळा आणि साहस स्पर्धा यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search