Next
‘स्वरूप फाउंडेशन’तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
BOI
Saturday, December 29 | 04:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : पुण्यातील ‘स्वरूप फाउंडेशन ’ या सामाजिक संस्थेतर्फे आशियातील प्रतिभावान आणि भविष्यातील लघुपट निर्मात्यांसाठी लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूपर स्क्रीन शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन २०८-१९’ असे नाव असलेली ही स्पर्धा, या क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांच्या कौशल्य विकासात वाढ व्हावी या उद्देशाने २४ फेब्रुवारी २०१९ला घेण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात चित्रपट निर्मीतीसाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्राकडे, तसेच योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन यांकडे दुर्लक्ष होते. असे असताना ‘सुपर स्क्रीन शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन २०८-१९’च्या माध्यमातून प्रामाणिक चित्रपट निर्मात्यांचा एक मोठा पूल तयार करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच उदयोन्मूख चित्रपट निर्मात्यांसाठी योग्य मंच प्रदान करणे आणि ग्रामीण भागातील या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांचा संघर्ष कमी करणे याबाबत या स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे, असेही सांगण्यात आले. 

स्वरूप फाउंडेशन  ही संस्था तरुण आणि गतीशील व्यक्तीमत्वांनी परिपूर्ण असून या कार्यकर्त्यांमार्फत समाजात सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्यरत आहे. 

स्पर्धा कार्यक्रम – 
स्पर्धा आयोजक : स्वरूप फाउंडेशन , पुणे
स्पर्धा प्रवेश तारीख : एक डिसेंबर २०१८ ते २९ जानेवारी २०१९
कार्यशाळेची तारीख : २३ आणि २४ फेब्रुवारी २०१९
पारितोषिक वितरण समारंभ : मार्च २०१९
स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link