Next
मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ‘शालोम’चे ‘लिव्ह टू गिव्ह’ अभियान
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : शालोम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने बांधकाम मजुरांची मुले व कुटुंबियांना शैक्षणिक हातभार लावण्यासाठी ‘लिव्ह टू गिव्ह‘ हे अभियान सुरू केले आहे. आठ जून २०१९ रोजी ‘शालोम’तर्फे बांधकाम मजुरांच्या वस्तीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून, या वेळी १०० मुलांना २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी दप्तरे, पाण्याच्या बाटल्या, स्टेशनरी, वह्या व शाळेसाठी लागणारे इतर आवश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. 

वंचित कुटुंबातील मुलांनी शालेय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून आपले व आपल्या कुटुंबियांच्या जीवनात समृद्धी आणावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शालोम ट्रस्टमार्फत केले जाते. या मुलांना शाळेत जाण्यासाठी मदत मिळण्यासाठी, शाळेत आवश्यक असणाऱ्या मूलभूत वस्तू त्यांना पुरवण्यासाठी एक लाखाहून जास्त निधी उभा करण्यात आला आहे. अनाथ मुलांसाठी वैद्यकीय व दंत तपासणी शिबिरे आयोजित करणे, वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमधील लोकांच्या पुनर्वसनासाठी सायक्लॉन गाजा रिलीफ कॅम्प्स आणि १५० पेक्षाही जास्त मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी वेल्फेअर होम्सना मदत पुरवणे अशी विविध समाजोपयोगी कामे ‘शालोम’मार्फत केली जातात. 

या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आठ जूनला खराडी येथे इऑन आयटी पार्कच्या मागे, मिलेनियम बांधकाम मजुरांच्या निवासी वस्तीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन ‘शालोम’तर्फे करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 74 Days ago
Is this an event organised as an exercise in Public Relations ? Well , momentary relief is useful as well .
0
0

Select Language
Share Link
 
Search