Next
मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा
आधुनिक वडील-मुलाच्या नात्याचे आयाम समजून घेण्यासाठी ‘ब्रेनली’चे सर्वेक्षण
प्रेस रिलीज
Thursday, June 13, 2019 | 12:15 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुलांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा वाटा मोलाचा आहे. प्रत्येक तीनपैकी एक पिता आपल्या मुलाला अभ्यासात मदत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत असल्याची बाब ‘ब्रेनली’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही निदर्शनास आली आहे. आधुनिक वडील-मुलाच्या नात्याचे आयाम समजून घेण्यासाठी आणि विशेषतः मुलाच्या शैक्षणिक जीवनात वडिलांच्या भूमिकेचे मूल्यमापन करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

मुलाचे व्यक्तिमत्त्व आणि दृष्टिकोन घडवण्यात त्याच्या वडिलांची भूमिका कशी महत्त्वाची असते यावर या सर्वेक्षणातून प्रकाश टाकण्यात आला. आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासात केवळ त्यांच्या आईच मदत करतात या जुन्या कल्पनेला देखील या अभ्यासातून छेद देण्यात आला.

मुंबईतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणातून दिसून आले की ७० टक्के मुलांना शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात वडिलांची भूमिका महत्त्वपूर्ण वाटते. मुंबईत अनेक वडील आपल्या मुलांच्या शिक्षणात रस घेतात; पण त्यापैकी बरेचसे, मुख्यतः त्यांच्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे, मुलांना त्यांच्या अभ्यासात सक्रिय आणि परिणामकारकरित्या मदत करू शकत नाहीत. सर्वेक्षणानुसार ५६ टक्के वडिलांना आपल्या मुलांच्या शिक्षणात खूप रस असल्याचे दिसून आले, पण त्यातील फक्त एक तृतीयांश मुलांना अभ्यासात मदत करू शकत आहेत. ४० टक्के पिता आपल्या मुलांनी पुस्तके आणि नोट्स यांच्या माध्यामातून अभ्यास करावा, अशा मताचे आहेत, तर ३० टक्के पिता ‘ब्रेनली’सारख्या ऑनलाइन मंचांची शिफारस करतात. अधिकाधिक पालक आता वैकल्पिक ऑनलाइन अभ्यास पद्धती आणि त्यांच्या फायद्यांबाबत जागरूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः जेव्हा ते स्वतः आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी वेळ देऊ शकत नसतील.

या अभ्यासातून हे समजले की, ४८ टक्के वडील आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि अशा प्रकारे अभ्यास आणि मौज यांच्यात चांगले संतुलन साधण्यात मदत करतात. सहभागींपैकी ७९ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचे वाटते. 

‘ब्रेनली’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल बोर्कोव्हस्की म्हणाले, ‘आपले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम तयारी करणे हे आज बहुतांशी मुलांचे लक्ष्य असते, मग ही तयारी शाळेच्या, शिक्षकांच्या किंवा ट्यूटरच्या मदतीने असो. परंतु, या मागील प्रेरणा ही बहुतेक वेळा त्यांचे पालकच असतात. खरी गोष्ट ही आहे की, आई-वडील दोघेही आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका या ना त्या प्रकारे बजावत असतात. मुंबईच्या बाबतीत सांगायचे, तर वडील आपल्या मुलांच्या अभ्यासेतर प्रवृत्तींच्या बाबतीत प्रोत्साहक आहेत. आपल्या मुलाच्या शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्या इतर प्रवृत्तींमधील प्रतिभेलादेखील वडील महत्त्व देत असतात हे एक उत्साहवर्धक लक्षण आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search