Next
‘सप्तसुरांच्या जादू’ने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध!
BOI
Friday, August 02, 2019 | 06:22 PM
15 0 0
Share this article:पुणे :
पुण्यातील ‘सुरभी’ या संस्थेतर्फे सादर झालेल्या ‘जादू सप्तसुरांची’ या आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमात रसिकांना संगीताच्या विविध प्रकारांची अनुभूती घेता आली. वेगवेगळ्या ठिकाणच्या हरहुन्नरी आणि प्रथितयश गायक कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचा मनुराद आनंद रसिकांनी घेतला. 

मराठी, हिंदी गाणी, शास्त्रीय संगीत, पाश्चात्य, तसेच कर्नाटक संगीत आणि गाण्याचे काही नवीन आविष्कार या कार्यक्रमात सादर झाले. दिग्दर्शक शेषाद्री अय्यर यांच्या कल्पनाविष्कारातून सादर झालेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केले.

मुंबईच्या प्रणिता देशपांडे, रवी कृष्णन, शैलेश माविनकुर्वे, अंकिता अरुण, अक्षय रवी, माणिक डे आणि पुण्याच्या अनघा बर्वे, गौरी कुंटे, दीपा बेके या प्रतिभावान गायक कलाकारांचे रसिकांनी खूप कौतुक केले. रवी फडके यांनी मेहदी हसन यांच्या गझल उत्तम प्रकारे सादर केल्या. पॅरिसहून आलेल्या राज अय्यर यांनी त्यांच्या तरल आणि भावपूर्ण आवाजाने सगळ्यांची मने जिंकली. अमेरिकेहून आलेल्या पृथ्वी अय्यर आणि अनुश्री शंकर यांनी पाश्चात्य शैलीतील गायकीतून गीते सादर केली. याचबरोबर राज व पृथ्वी यांनी सादर केलेली मेडलीही रंगतदार होती.

१२ वर्षांच्या जय सूर्यवंशी याच्या पियानोवादनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले! त्याने पाश्चात्य रचना पियानोवर सहज, सुंदररीत्या सादर केल्या. ऑर्गनवर संतोष कुलकर्णी, अॅकॉर्डियनवर नंदकुमार फौजदार, बेसगिटारवर कांचन निंबाळकर, ढोलकवर शेखर देशपांडे, तबल्यावर राजू हसबनीस, ऑक्टोपॅडवर संजय खाडे यांनी गायकांना उत्तम साथ केली. अनुपमा कुलकर्णी यांनी प्रभावी निवेदन केले.

तीन तासांच्या या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन प्रसिद्ध अॅकॉर्डियनवादक शेषाद्री अय्यर यांचे होते. त्यांनी प्रेक्षकांना अॅकॉर्डियनवादनाने मंत्रमुग्ध केले. १५ मिनिटांचा हार्मनी आविष्कार या कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू ठरला! यामध्ये कलाकरांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन केवळ सुरेल आवाजात किचकट अशा रचना केवळ कॉर्डद्वारे सादर केल्या.

मोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ध्वनिव्यवस्था सांभाळली. मुंबईच्या लालजीभाई आणि सुरेश यांनी ऑडिटोरियमला सुंदर साज चढविला होता. मध्यंतरामध्ये पूजा अय्यर यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन झाले. त्यांच्या दोन चित्रकृतींचे अनावरण राज अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. पूजा पॅरिसला वास्तव्यास असून, त्या एक प्रतिभावान चित्रकार आहेत. त्यांनी आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरविले आहे. पुण्यातही त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.

पुणेकर रसिकांनी आदर्श अभिनव सभागृहात एक रम्य, अविस्मरणीय अशी ‘सप्तसुरांच्या जादू’ने भारलेली संध्याकाळ अनुभवली. असा सुंदर कार्यक्रम रसिकांसमोर आणल्याबद्दल प्रेक्षकांनी ‘सुरभी’चे विराज पाध्ये, संतोष कुलकर्णी यांचे विशेष कौतुक केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search