Next
अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, July 24, 2018 | 12:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑपथेलमॉलजी (एनआयओ) आणि रन बडीज् क्लब यांच्यातर्फे आयोजित चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, समृद्धी पोल, शाश्वत शुक्ला, हिमांगी गोडबोले, वाघिशा कुमार, प्रवीण ठाकरे, सानिया केळकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले.

पाच किमी, १० किमी, १५ किमी आणि २१ किमी या प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण एक हजार ५०० धावपटू सहभागी झाले होते. यामध्ये ५०० ब्लाइंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलेन्स, बाणेर येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. औंधच्या दिशेने पुन्हा फिरून रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलेन्स येथे स्पर्धेची समाप्ती झाली. एनआयओ व्हिजन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, यामध्ये डोळे बांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला.

अर्ध मॅरेथॉन (२१ किलोमीटर) पुरुष खुला (४० वर्षांखालील)गटात अनुराग कोंकरने १ तास २६ मिनिटे ११ सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. हिरेन पटेल व हरिशचंद्र लोहटकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात समृद्धी राजपूतने १ तास ५६ मिनिटे ३९ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. याच गटात कीर्ती पोलने २ तास २१ मिनिटे २८ सेकंद आणि प्राची वापलेकरने २ तास २३ मिनिटे ३६ सेकंद वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. १० किमी पुरुष खुल्या (४० वर्षांखालील) गटात शाश्वत शुक्लाने ३९ मिनिटे २२ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओ व्हिजनचे डॉ. श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. रन बडीज्‌ क्लबचे अरविंद बिजवे, निखील शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

(अर्ध मॅरेथॉनचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link