Next
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी
BOI
Saturday, March 03 | 06:30 PM
15 0 0
Share this story


भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.
................................
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!
नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी!
तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला 
अगे भक्तिसोपान सोपा भला
दुजा वेद तूं! धन्य तूं वैखरी!
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें
मराठी स्वराज्या असे स्थापिलें
अशी धन्य तूं वीरधात्री खरी! 
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

तुझी माधुरी मोदमात्रावहा
फुलांनी, मुलांनी खुले गे अहा!
कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी!
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!

तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा
नमो कृष्ण-रामा नमो भास्करा
तुझे लाडके हे धरावे शिरीं
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी!
- रा. अ. काळेले

(मराठीचं कौतुक करणाऱ्या सर्व कविता https://goo.gl/1UGvB9 या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link