Next
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा
BOI
Tuesday, September 24, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

कार्यशाळेचे उद्घाटन करताना मान्यवर

कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली. सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा संकुलामध्ये झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी होते, तर डॉ. आभाळे, डॉ. उगले, डॉ. चाकणे, डॉ. लोखंडे, सुनेत्रा पवार, तसेच नियोजन व विकास विभागाचे प्रमुख रासने आदी सदस्य मंडळी या वेळी हजर होती. 

प्रा. डॉ. बी. एन. जगताप, आनंद म्हापुस्कर, डॉ. व्ही. जी. गायकर यांनी उच्च शिक्षणातील नवीन प्रवाहांची माहिती दिली. डॉ. आर. एस. माळी यांनी नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिनियमांच्या निर्मितीबाबत माहिती दिली. डॉ. एस. पी. लवांडे यांनी स्वायत्त महाविद्यालयाची संकल्पना स्पष्ट केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search