Next
सोहळा बाप्पाचा स्पर्धेला प्रतिसाद
BOI
Wednesday, September 19, 2018 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘सोहळा बाप्पाचा’ या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीच्या अनोख्या स्पर्धेला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत प्रथमच अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत ५० गणपतींचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. २० व्हिडिओ फेसबुक पेजवर अपलोड झाले असून, सुमारे दहा हजार जणांनी या पेजला भेट दिली आहे.

येथील टीम जीनियस आणि ऑफबीट आर्टिस्ट यांच्या वतीने आणि श्री लाल गणपती प्रतिष्ठान पुरस्कृत गणपती व आरास यांच्या सिनेमॅटिक व्हिडिओची ‘सोहळा बाप्पाचा २०१८’ ही स्पर्धा सध्या सुरू आहे. तालुक्यातील विविध ठिकाणचे बाप्पा आणि त्यांची पर्यावरणपूरक आरास, सजावट यांचा दीड मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यात येतो. तो फेसबुक पेजवर प्रदर्शित केला जातो. आतापर्यंत ५० गणपतींचे व्हिडिओ दहा हजार जणांपर्यंत पोहोचले आहेत.

फेसबुक पेजवर जास्त लाइक्स मिळणार्यां ना ११ हजार १११, सात हजार ७७७, आणि चार हजार ४४४ रुपये, चषक व प्रमाणपत्र अशी पहिली तीन पारितोषिके दिली जातील. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. उत्कृष्ट सजावटीसाठी विशेष बक्षीस व प्रत्येक सहभागी स्पर्धकाला एक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सचिन झगडे, परेश राजिवले, अमर शेठ, सिद्धांत शिंदे, अमित आंबवकर, नीलेश कोळंबेकर, विनय बुटाला, सचिन शिंदे, अनुपम तिवारी, अनिकेत दुर्गवली आणि साई आंबुलकर ही टीम चित्रीकरण करत आहे. व्हिडिओ एडिटिंगचे काम साईप्रसाद पिलणकर, निखिल पाडावे आणि समन्वयक सिद्धेश बंदरकर व साई माचकर करत आहेत. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

(विविध गणपतीबाप्पांची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत. 
‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search