Next
‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू
प्रेस रिलीज
Monday, July 16, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असते, प्रेमाची भावना गुलाबी असते, असे दाखवण्यात आले. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू ‘स्टार प्रवाह’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून मांडणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ही मालिका येत असून, १६ जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका पाहता येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘स्टार प्रवाह’ने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून नवीन कलाकार प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘स्टार प्रवाह’ची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नवी मालिका. मराठी टेलिव्हिजनवर प्रेमाची काळी बाजू पहिल्यांदाच सादर करणारी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता दाखविली जाणार आहे.

सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर गुन्ह्यांच्या तपासावर आधारित अनेक कार्यक्रम झाले असले, तरी केवळ प्रेमाशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित मालिका करण्याचा पहिला प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ करत आहे. त्यामुळेच या मालिकेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या, ‘लक्ष्य आणि पंचनामा या कार्यक्रमांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांसोबत ‘स्टार प्रवाह’चे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. या नात्याचा मान ठेऊन पुढची पायरी गाठण्याचा आमचा मानस आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हा कार्यक्रम ही पायरी गाठेल याची आम्हाला खात्री आहे.’

गश्मीर महाजनीने अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतून गश्मीर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. त्याच्या खास शैलीने मालिकेतील कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे. याबाबत गश्मीर म्हणाला, ‘एक संवेदशनशील व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत आपले मत मांडणे हे मी माझे कर्तव्य समजतो. बऱ्या-वाईट घटनांबद्दल मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रपरिवाराशी नेहमी संवाद साधतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रेक्षकांशीही मला मनमोकळा संवाद साधायला मिळणार आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link