Next
‘आंतरराष्ट्रीय फ्लोरा’ प्रदर्शन २२ फेब्रुवारीपासून पुण्यात
प्रेस रिलीज
Tuesday, February 19, 2019 | 03:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) क्षेत्राच्या उत्पादनात आश्चर्यकारक बदल झाला असून, या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन मीडिया टुडे ग्रुपतर्फे पुण्यात २२ ते २४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत १४व्या आंतरराष्ट्रीय फ्लोरा प्रदर्शन आयोजित केले आहे. या बरोबर ११वे आंतरराष्ट्रीय होर्टी व १३वे आंतरराष्ट्रीय लँडस्केप आणि गार्डनिंग एक्सपोही मगरपट् येथील लक्ष्मी लॉन्स येथे भरवण्यात येणार आहे.  

हे प्रदर्शन फ्लोरिकल्चर, नर्सरी आणि ग्रीनहाउस टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चरल प्रॉडक्ट्स, फार्म मशिनरीज आणि प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज या क्षेत्रासाठी भारतातील सर्वांत भव्य प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. या प्रदर्शनाच्या मुख्य आकर्षणांमध्ये उत्पादने व तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामध्ये फुले, फळ भाज्यांची रोपे, औषधी वनस्पती आणि सजावटीचे रोपे, आंतरराष्ट्रीय फुले तसेच हायड्रोपोनिक्स, सौरऊर्जेचे तंत्रज्ञान, प्लांट टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि ग्रीनहाउस तंत्रज्ञान, ऑटोमेशन आदी गोष्टी प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

२३ फेब्रुवारी रोजी ‘हरित गृहनिर्माण संकल्पना’ या विषयावर ‘वनस्पती, ठिकाणे आणि लोक’ अशा आंतरराष्ट्रीय परिषद आणि नेटवर्किंग मीटचे आयोजन लक्ष्मी लॉन्स येथे केले आहे; तसेच ज्या व्यक्तींनी हरित क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यांना २३ तारखेलाच ‘इंडियन फ्लॉवर अँड प्लांट्स इंडस्ट्री एक्सलन्स अॅवॉर्ड्स देऊन सन्मानित केले जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link