Next
पाऊस
BOI
Monday, August 14, 2017 | 07:22 PM
15 0 0
Share this article:

पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी...ओढ्याची नदीत, नदीची सागरी ...

‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज पाहू या कवी विठ्ठल वाघ यांची ‘पाऊस’ ही कविता...
.........
पाऊस असतो तलम पोताचा
कापुरी कायेचा रेशमी हाताचा...

पाऊस असतो खरा सहोदर
नभात जाऊन गाठतो सागर...

पाऊस असतो जीवाचा भावाचा
सुख-दु:खांतून डोळ्यात यायचा...

पावसाची दृष्टी असते सारखी
पहाड असो वा टेकडी बारकी ...

पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी
ओढ्याची नदीत, नदीची सागरी ...

पाऊस सोसतो विजांचा सुकाळ
तरी अमृताचे ओठांत कल्लोळ ...

पावसासारखं कुठं नातं-गोतं?
काहीच न घेता फक्त राही देत ...

पाऊस रिकाम्या हातानं येईना
जाताना काहीही घेऊन जाईना...
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
M.M. GOLEKAR About 171 Days ago
khapara che dive kavita wachayala chagali kru ti kavita wachava9ya milevi ple
0
0
Sunil Takalkar About
Mast Kavita .... Arthpurna sentiments
0
0

Select Language
Share Link
 
Search