Next
फोर्डची कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेइकल ‘फ्रीस्टाइल’ दाखल
प्रेस रिलीज
Friday, April 27 | 01:10 PM
15 0 0
Share this story

फोर्डतर्फे पहिली कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल ‘फ्रीस्टाइल’ सादर करताना फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा व गौरव गिल

पुणे : फोर्डतर्फे पहिली कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल ‘फ्रीस्टाइल’ भारतीय बाजारपेठेत दाखल  करण्यात आली आहे.  तिची किंमत  पाच लाख नऊ हजार रुपयांपासून सुरू आहे. फोर्डतर्फे सादर करण्यात आलेल्या या जागतिक दर्जाच्या कारचे  डिझाइन एसयूव्हीसारखे असून, अतिशय उत्तम कामगिरी, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इंधन सक्षमता असलेली ही कार ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.  सहा नव्या रंगांत ही कार उपलब्ध आहे.
 
याबाबत फोर्ड इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा म्हणाले, ‘नवी फोर्ड ‘फ्रीस्टाइल’ कार तरुणांसाठीची कूल कार आहे. नव्या दमाचे भारतीय ग्राहक एसयूव्हीसारख्या दिसणाऱ्या गाडीच्या शोधात आहेत. ग्राहकांच्या आतापर्यंत पूर्ण न झालेल्या गरजांसाठी ‘फ्रीस्टाइल’ परिपूर्ण ठरेल आणि ग्राहकांना एसयूव्हीच्या स्टाइलची तसेच पूर्णपणे सक्षम व त्यांना हव्या असलेल्या किंमतीत गाडी उपलब्ध होईल
 
फ्रीस्टाइलमध्ये फोर्डच्या नव्या, तीन सिलिंडर असलेल्या १.२ लीटरच्या  पेट्रोल इंजिनचा समावेश आहे.  ही गाडी लहान, वजनाने हलकी, तरीही मजबूत आणि उत्तम इंधन सक्षमता पुरवणारी आहे. नावीन्यपूर्ण आणि उत्तम दर्जाच्या इंटलिजंट तंत्रज्ञानाचा समावेश हे हिचे खास वैशिष्ट्य आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link