Next
विद्या बालन, शक्तीमोहनची ‘हवा हवाई’ जादू
प्रेस रिलीज
Monday, November 06 | 06:26 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘तुम्हारी सुलू’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी अभिनेत्री विद्या बालन नुकतीच ‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. या  कार्यक्रमात तिने ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘हवाहवाई’ या श्रीदेवीच्या गीतावर  नृत्यांगना शक्तीमोहनसमवेत नृत्य सादर
करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शक्तीमोहन ही विद्या बालनची मोठी चाहती आहे. विद्या बालनने आपल्या तालावर नृत्य करावे,  अशी इच्छा शक्तीमोहनने व्यक्त केली.  आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दी मोहिमेत गुंतल्याने थकलेली असूनही विद्या बालनने शक्तीबरोबर नृत्य करण्याची तयारी दर्शविली आणि त्यासाठी तिने ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘हवाहवाई’ हे आपले आवडते गाणे निवडले. विद्या बालन स्वत: श्रीदेवीची मोठी चाहती असल्याने तिने मुद्दाम तिचे हे गीत निवडले.शक्तीमोहन,  विद्या आणि सूत्रसंचालिका रिध्दिमा यांनी  ८०च्या दशकातील या सुपरहिट गाण्यावर बहारदार नृत्य करून  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  या वेळी परिक्षक  टेरेन्स आणि रेमो डिसुझाही  हजर होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link