Next
‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : एका वर्षात विक्रीमध्ये एक दशलक्षची वाढ करणारी जगातील व भारतातील पगिली कंपनी ठरून नवा विश्वविक्रम रचल्यानंतर, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी भारतासाठी आपले नियोजन जाहीर केले.

गुणवत्ता व संख्या या माध्यमातून भारतात व जगात आघाडी घेण्याच्या ‘होंडा’च्या उद्दिष्टाला अनुसरून, ‘होंडा मोटरसायकल’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरु कातो म्हणाले, ‘होंडाच्या जागतिक टू-व्हीलर व्यवसायामध्ये योगदान देण्याच्या बाबतीत अगोदरच भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आमच्या विक्रमी विक्रीने २०१७-१८मध्ये भक्कम पाया रचला आहे व २०२०मध्ये सर्वात मोठे परिवर्तन आणण्याच्या हेतूने होंडा टू-व्हीलर्स इंडिया २०१८-१९मध्ये आपले स्थान अधिक सक्षम करणार आहे. ग्राहकांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने वाढीची हीच गती कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षीही दोन-आकडी वाढ साध्य करण्याच्या दृष्टीने आम्ही अंदाजे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.’

भारतासाठी निर्मिती करण्याच्या टप्प्यातून भारतासाठी सेवा देणे असा नेटवर्कचा विस्तार केला जाणार आहे. दूरवरच्या ठिकाणी अधिक भर देत ‘होंडा’ सहा हजार टचपॉइंटपर्यंत विस्तार करणार आहे. कोणत्याही उत्पादकातर्फे सुरू करण्यात आलेला या उद्योगातील पहिली प्री-ओन्ड टू-व्हीलर व्यवसाय या वर्षी २५० टचपॉइंटपर्यंत विस्तारला जाणार आहे. टू-व्हीलरच्या रिप्लेसमेंटचा कालावधी पाच ते सात वर्षांवरून तीन ते पाच वर्षांपर्यंत कमी होत असताना, ‘होंडा’च्या सध्याच्या ३६ दशलक्ष ग्राहकांमुळे प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान मिळावे या हेतूने, ‘होंडा’ २०१८मध्येच ‘होंडा जॉय क्लब’ हा खास कस्टमर लॉयल्टी कार्यक्रम सुरू करणार आहे.

२०१७-१८मधील ‘होंडा’च्या कामगिरीविषयी सांगताना ‘होंडा मोटरसायकल’च्या सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘२०१७-१८ हे वर्ष अनेक प्रकारे ‘होंडा’साठी ऐतिहासिक वर्ष ठरले. अपूर्व वेगाने प्रगती करणारी, एका वर्षात एक दशलक्षहून ग्राहक जोडणारी होंडा टू-व्हीलर्स इंडिया ही एकमेव टू-व्हीलर कंपनी आहे. देशांतर्गत व निर्यात क्षेत्रामध्ये प्रचंड मागणी असल्याने, होंडाच्या विक्रीमध्ये सहा लाख १२३ ८८६ युनिट, म्हणजे २२ टक्के वाढ अपेक्षित आहे. ‘होंडा’ने स्कूटर श्रेणीतील आपले स्थान यशस्वीपणे सक्षम केले आहे; तसेच नव्या मोटरसायकल ग्राहकांमध्ये वाढ केली आहे. चार पूर्णतः नवी मॉडेल, क्षमतेमध्ये नव्याने वाढ करून आणि ५०० नवी आउटलेट सुरू केल्याने ‘होंडा’च्या प्रगतीला चालना मिळाली आणि भविष्यातील वाढीसाठी भक्कम पाया रचला गेला.’

२०२०साठी धोरणात्मक सक्षमीकरण सुरू
गुणवत्ता व संख्या या माध्यमातून भारतात व जगात पुढील बाबतीत आघाडी घेण्यासाठी होंडा प्रयत्नशील आहे. २०२०मध्ये नव्या BS-VI नियमांचा स्वीकार करण्यापूर्वी योग्य तयारी करण्याच्या दृष्टीने, होंडा विक्री, संशोधन व विकास, परचेस व गुणवत्ता अशा विविध विभागांतील मनुष्यबळाच्या मदतीने गुणवत्ता उंचावणे, उत्पादनाचे नियोजन करणे व माफक दर ठेवणे ही प्राथमिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.   

अंतर्गत कंपनीमध्ये, ‘होंडा’ने सर्व प्रकल्पांमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये आधुनिकीकरण व एकीकरण यांना सुरुवात केली आहे. यामुळे ‘होंडा’ला प्रचंड कार्यक्षमतेसह उच्च उत्पादकता व जागतिक मापदंडांना अनुसरून उत्पादन गुणवत्ता, असे फायदे होणार आहेत. कंपनीच्या बाहेर, होंडाने उत्पादनामध्ये सुरळीत व वेळेवर अपग्रेडेशन करण्यासाठी पुरवठादारांसाठी BS-VIसाठी नियोजन जाहीर केले आहे.

नव्या नियोजनामुळे ब्रँड अधिक सक्षम होणार
ब्रँड होंडाचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी व सर्व संबंधित घटकांच्या बाबतीत सक्षम होण्यासाठी होंडा टू-व्हीलर्स इंडियाने नवे ब्रँड व कम्युनिकेशन ऑपरेशन निर्माण केले आहे. नव्या ऑपरेशनमध्ये रस्ते सुरक्षा प्रमोशन आणि मोटरस्पोर्ट्सद्वारे रेसिंग डीएनए ऑफ होंडा यांचा समावेश आहे. ‘होंडा ब्रँड’चे जगभरातील दोन मुख्य स्तंभ आहेत. सर्व संबंधित घटकांशी संवाद साधणे हा नवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभाग असेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search