Next
‘सियाम’तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
प्रेस रिलीज
Wednesday, June 06, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह फिटनेस अँड एन्व्हॉयर्नमेंट (सेफ) या भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या सियाम (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) संघटनेच्या उपक्रमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी देशभरातील सात हजार २०० ऑटोमोबाइल डीलर्समध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

पर्यावरणाचे संरक्षण व पुनरुज्जीवन याबद्दलच्या या उपक्रमांमध्ये, शाश्वत विकास व वाढ याविषयी जागृती करण्याची शपथ घेण्यात आली. पर्यावरणाप्रती काम करण्यासाठी, तसेच अधिक विस्तार व सेवा देण्यासाठी देशभरातील निवडक डीलरशिपमध्ये हा उपक्रम आठवडाभर राबवला जाणार आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो; परंतु पर्यावरणाची सध्याची स्थिती पाहता प्रतिबंध व संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्षासाठी जागतिक आयोजक असलेल्या भारताने ‘प्रदूषणावर मात’ ही संकल्पना ठरवली आहे. या निमित्ताने, ‘सियाम’ने प्लास्टिकची वाढती समस्या सोडवण्यासाठी पर्यायी धोरण ठरवायचे निश्चित केले आहे.

शाश्वत विकासासाठी पद्धती आखण्याची व राबवण्याची गरज विचारात घेत ‘सियाम–सेफ’ उपक्रमाने पाण्याची तीव्र चणचण व त्यातून कमालीची टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात घेतली आहे. सर्वसाधारण कार धुण्यासाठी १२० लिटर पाणी लागत असल्याने, पाण्याची बचत करण्यासाठी प्रत्येक कार सदस्यासाठी ड्राय वॉशिंग ही सुविधा अवलंबण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्व ‘सियाम’ सदस्य जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यासाठी एकत्र येत आहेत.

सर्वसमावेशक अभियानाच्या अंतर्गत, अंदाजे एक लाख वाहनांची मोफत फिटनेस व प्रदूषणविषयक तपासणी (पीयूसी) करण्यात आली. बालकांसाठी पर्यावरणाविषयी स्पर्धा घेण्यात आली. नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी दिल्ली पोलिस व ट्रॅफिक पार्क्स यांनी वाहतुकीचे नियम व रस्ते सुरक्षा याविषयी विशेष प्रशिक्षण सत्र आयोजित केले होते. या उपक्रमाचा भाग म्हणून ग्राहकांना रोपांचे वितरण व वृक्षलागवड करण्याबरोबरच, टिप्स व सूचना देण्यात आल्या. सर्व डीलरशिप आउटलेटमध्ये सर्कल ग्रीन रॅली, जागृतीपर रॅलीचे आयोजन केले होते.

यानिमित्त बोलताना ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथूर म्हणाले, ‘शाश्वत विकासाबद्दल पॅशनेट असलेली जबाबदार संघटना म्हणून, आमच्या कामाची व राष्ट्रनिर्मितीची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. सरकारने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांना ऑटोमोबाइल उद्योगाचा पूर्ण पाठिंबा आहे. पाच जून २०१८ रोजी, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ‘सियाम–सेफ’ सदस्यांच्या मदतीने ‘सियाम’ने पर्यावरणाच्या रक्षणाप्रति जागृती करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. आमचे सात हजार २०० सदस्य डीलर वाहनांतील प्रदूषणाची पातळी तपासून व ग्राहकांना मोफत पीयूसी सर्टिफिकेट उपलब्ध करून व वाहनांच्या देखभालीविषयी माहिती देऊन, या अभियानात सहभागी होत आहेत. या अभियानामुळे, ‘सियाम–सेफ’चे वाहन मालकांना शिक्षित करण्याचे व त्यांना बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.  यामुळे पर्यावरण हरित, स्वच्छ व सुरक्षित राखले जाईल. यामध्ये समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे व लोकांच्या सहभागाने आम्ही आमचे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास वाटतो.’

विविध उत्पादक आपल्या डीलरशिपद्वारे यामध्ये सहभागी होणार असून, अशोक लेलँड लि., बजाज ऑटो लि., फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स प्रा. लि., जनरल मोटर्स इंडिया प्रा. लि., हिरो मोमोकॉर्प लि., होंडा कार्स इंडिया लि., होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि., ह्युंदाई मोटर इंडिया लि., इंडिया यामाहा मोटर प्रा. लि., महिंद्रा अँड महिंद्रा लि., मारुती सुझुकी इंडिया लि., निस्सान मोटर इंडिया प्रा. लि., रेनॉल्ट इंडिया प्रा. लि., स्कोडा ऑटो इंडिया प्रा. लि., एसएमएल इसुझु लि., टाटा मोटर्स लि., टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि., टीव्हीएस मोटर कंपनी लि. यांचा यामध्ये समावेश आहे.

‘सेफ’विषयी :

वाहनांचे इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन (आयअँडसी) करण्यास चालना देण्यासाठी व वापरातील वाहनांमधून एमिशन कमी करण्यासाठी, तसेच रस्त्यावर अधिक सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह फिटनेस अँड एन्व्हॉयर्नमेंट (सेफ) ही स्वतंत्र संघटना सुरू केली आहे. उद्योग, सरकार, टेस्टिंग एजन्सी व एनजीओ यांचे सदस्यत्व असलेली ‘सेफ’ विविध घटकांमध्ये जागृती करण्यासाठी काम करणार आहे, वाहनाची सुरक्षितता व स्वच्छ पर्यावरण या दृष्टीने वापरातील वाहनांचे इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन यासाठी आग्रह धरणार आहे.

‘सेफ’ने देशाच्या विविध भागांत वापरातील वाहनांसाठी इन्स्पेक्शन क्लिनिक्स व एमिशन टेक्निशिअन्ससाठी प्रशिक्षण कार्यशाळा यांचे आयोजन केले आहे. हे कार्यक्रम नियमित देखभालीचे महत्त्व या एमिशनचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी एका अत्यंत प्रभावी मार्गाविषयी वाहन मालकांमध्ये जागृती करणार आहेत; तसेच राज्य सरकार व अन्य घटकांच्या मदतीने ‘सेफ’ सेमिनारचे आयोजन करणार आहे.

‘सेफ’ने विद्यार्थी, चालक व सर्वसामान्य लोक यांच्यासाठी रस्ता सुरक्षेचे शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रस्ता सुरक्षा जागी कार्यक्रमाद्वारे ‘सेफ’ लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देते व रस्त्यावरील इतर व्यक्तींप्रती योग्य, जबाबदार वर्तन रुजवते. स्वच्छ व सुरक्षित पर्यावरण याविषयीची बांधिलकी पूर्ण करण्याच्या ऑटोमोबाइल उद्योगाच्या प्रयत्नांमध्ये ‘सेफ’ मार्गदर्शक आहे आणि यापुढेही एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून या उद्योगाची भूमिका कायम राखणार आहे.

‘सियाम’विषयी :
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ही विना-नफा तत्त्वावरील सर्वोच्च राष्ट्रीय संघटना असून, ती भारतातील सर्व मुख्य वाहने व व्हेइक्युलर इंजिन उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करते. ऑटोमोबाइलचे डिझाइन व उत्पादन करण्यासाठी भारत हे जगातील पसंतीचे ठिकाण ठरावे, या हेतूने ‘सियाम’ भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाच्या शाश्वत विकासाला पाठबळ देते. भारतीय ऑटोमोबाइल उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवणे, वाहनांसाठीचा खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे व गुणवत्तेचे जागतिक मापदंड साध्य करणे, यासाठीही सियाम कार्यरत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search