Next
डीकेटीईमध्ये ‘क्वॉलिटी इव्हॅल्युएशन इन टेक्स्टाईल्स’ विषयावर चर्चासत्र
प्रेस रिलीज
Wednesday, August 22, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

चर्चासत्रात मार्गदर्शन करताना निसीकेन कंपनीचे अकीरा निशीहारा व युको फुकई

इचलकरंजी : येथील डीकेटीई इन्स्टिटयूट व इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स, कोल्हापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डीकेटीईमध्ये ‘क्वॉलिटी इव्हॅल्युएशन इन टेक्स्टाईल्स’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, उद्योजक व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. 

चर्चासत्राचे उद्घाटन कोल्हापूरमधील ‘आईआय सेंटर’चे संचालक संजय खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डीकेटीईचे संचालक व इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्सचे चेअरमन प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी आईआय व डीकेटीई यांनी संयुक्तपणे राबविलेल्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. इन्स्टिटयूटचे उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डीकेटीईचे माजी विद्यार्थी व निसीकेन इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर वरुण गौड यांनी जापनीज स्टॅंडर्ड फॉर टेस्टींग, ओको टेक्स १००, सेक मार्क अशा विविध प्रक्रियांबाबत  सविस्तर माहिती दिली. निसीकेनचे जनरल मॅनेजर अकीरा निशीहारा व युको फुकई यांनी निसीकेन क्वालिटी इव्हॅल्युएशन प्रोसेसवर मार्गदर्शन केले.  

सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनिकेत भुते यांनी प्रेझेंटेशनव्दारे नॉनवोव्हन क्वॉलिटी इव्हॅल्युएशन मेथेडॉलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले. टेक्स्टाईल असोसिएशनचे बी. पुरुषोत्तमा यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रा. एस. एस. लवटे यांनी आभार मानले. हे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी प्रा. डॉ. एस. डी. आसगेकर यांनी समन्वयक म्हणून कार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search