Next
‘इनामदार’मध्ये रोबोटिक सायन्सच्या मदतीने शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : हाडांच्या चुकीच्या ठेवणीमुळे लांबीने कमी-जास्त झालेले पाय (पायांची हाडे) एकसारखी करण्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सायन्सच्या मदतीने अलीकडेच झाली.

इनामदार हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. मुर्तझा अदीब यांनी टेलर स्पाशियल फ्रेमसह व्यंगात सुधारणा करणारे तज्ज्ञ डॉ. आशिष रानडे यांच्या समवेत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. मुर्तझा यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

अयात या २२ वर्षीय वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थिनीच्या अस्थिरोग संबंधित समस्येवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अयात हिचा उजवा पाय चार सेंटीमीटरने उंचीला कमी होता, गुडघा आतमध्ये वाकलेला (व्हेरस) आणि बाहेरील बाजूस वळलेला (रोटेशन) होता. तिच्या या ठेवणीमुळे ती लंगडल्यासारखे चालायची. त्यामुळे तिच्या मणक्यामध्ये बाक निर्माण झाला होता. बालपणापासूनच तिला हा त्रास होता. तिच्या उजव्या गुडग्यात व्यंग होते. अकराव्या वर्षी तिच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. दुदैवाने या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे तिचा उजव्या पायात विकृती निर्माण झाली.

तिने अनेक चिकित्सकांशी सल्लामसलत केली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उपचार सल्ला मिळाला नाही. अखेरीस इनामदार हॉस्पिटलमधील ‘एफआरसीएस’ वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मुर्तझा यांच्याशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करायचे ठरविण्यात आले. ज्यामध्ये मांडीच्या हाडाच्या खालचा भाग कापून तो बाह्य भागी स्थिर करण्यात येणार होता. या शस्त्रक्रियेनंतर एक्स-रे मेजरमेंट आणि स्ट्रट कॅलिबर रिडिंग विशेष संगणक प्रणालीला पुरवले जात होते आणि संगणकाकडून स्ट्रट अॅडजस्टमेंटच्या सूचना चार आठवडे मिळत गेल्या.

या शस्त्रक्रियेत डॉ. मुर्तझा यांच्या समवेत डॉ. रानडे यांचे काम देखील मोलाचे आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे ऑर्थोपेडिक विज्ञान आणि रोबोट विज्ञान यातील एक सुंदर सांगड होती. ऑर्थोपेडिक सर्जन आणि रोबोटीक इंजिनियर यांच्या मिलाफातून ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सरळ चालू लागली. सहा महिन्यानंतर पायांची लांबी एकसारखी झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link