Next
‘दिलखुलास’मध्ये ‘पर्यावरणपूरक होळी’वर मुलाखत
प्रेस रिलीज
Saturday, March 16, 2019 | 02:37 PM
15 0 0
Share this story



मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक होळी’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विद्याधर वालावलकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून १८ व १९ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.      

पर्यावरणपूरक होळी कशी साजरी केली पाहिजे, होळी, धुळवड आणि रंगपंचमी यातील फरक, पर्यावरणपूरक रंग कसे ओळखावे, रासायनिक रंगांमुळे होणारे दुष्परिणाम, होळी, रंगपंचमी खेळताना लहान मुलांनी घ्यावयाची काळजी, नैसर्गिक रंग बनविण्याची पद्धत, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याकडे लोकांचा असलेला कल आदींविषयी सविस्तर माहिती वालावलकर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link