Next
‘लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे’
छायाचित्र मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात
BOI
Saturday, September 29 | 12:57 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या कामी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा; तसेच स्वंयसेवी संघटना, सामाजिक संघटना, सहकारी संस्था यांची मदत घ्यावी,’ असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

एक जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत नुकतीच बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘मागील वर्षापेक्षा या वर्षी मतदार संख्या कमी आहे. वास्तविक तरुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण मतदार यादीत त्यांची नोंदणी झालेली नाही. यासाठी राजकीय पक्षांनी बूथनिहाय एजंटची नियुक्ती करावी. हे एजंट यादीत नावनोंदणीसाठी प्रशासनाला सहकार्य करू शकतो.’

‘तरुण मतदारांच्या नावनोंदणीसाठी महाविद्यालयात आणि विद्यापीठात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कार्यक्रमातही राजकीय पक्षांनी योगदान द्यावे. महिलांची मतदार संख्या वाढण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत,’ असेही डॉ. म्हैसेकर यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी भोसले यांनी दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज भरून देण्याच्या सूचना केल्या.

तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी सादरीकरण केले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी मारुती बोरकर, ज्योती पाटील, प्रमोद गायकवाड, शिवाजी जगताप यांसह शेतकरी कामगार पक्षाचे विठ्ठल शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मनीश गडदे, प्रदीप पाटील, शिवसेनेचे प्रताप चव्हाण,  विजय पुकाळे, भारतीय जनता पक्षाचे दत्तात्रय गणपा, चंद्रशेखर येरनाळे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link