Next
जेम्स बॉंडचा २५वा चित्रपट लवकरच..!
भूमिकेसाठी तब्बल ४५० कोटी रुपयांचं मानधन
BOI
Saturday, April 27, 2019 | 06:20 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : जवळपास पाच दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा ‘जेम्स बॉंड’ याचा चित्रपट म्हणजे अजुनही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. बॉंड चित्रपट मालिकेतील २५वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या २८ एप्रिलपासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. 

चित्रपट इतिहासातील सर्वांत लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक समजली जाणारी जेम्स बॉंडची व्यक्तीरेखा पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. आगामी चित्रपटात अभिनेता डॅनिएल क्रेग हा जेम्स बॉंडची भूमिका साकारणार आहे. २००६पासून जेम्स बॉंडची भूमिका साकारत असलेला डॅनिएल ‘एजंट 007’ ही भूमिका आता पाचव्यांदा साकारणार आहे. आगामी चित्रपटातील डॅनिएलच्या या भूमिकेविषयी विशेष चर्चा होत आहे, ती त्याच्या मानधनाची. या चित्रपटातील भूमिकेसाठी डॅनिएलने तब्बल ४५० कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार २८एप्रिलपासून जमायका याठिकाणी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होत आहे. हे चित्रिकरण जपान आणि फ्रान्समध्ये होणार आहे. लेखक रेमंड बेन्सन यांच्या ‘नेव्हर ड्रीम ऑफ डाइंग’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा असेल. जेम्स बॉंडची भूमिका ही हॉलीवूड अभिनेत्यांसाठी नेहमीच ड्रीम रोल राहिली आहे. डॅनिएल क्रेग याच्याव्यतिरिक्त आजवर रॉजर मूर, प्रियस ब्रॉसनन, शॉन कॉनरी, टिमोथी डॉल्टन आणि जॉर्ज लेजेनबे यांनी एजंट 007 ही भूमिका केली आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search