Next
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे ‘जीमेल’चे ‘नज’ फीचर
BOI
Friday, July 20, 2018 | 06:22 PM
15 0 0
Share this story


जीमेल वापरकर्त्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी फीचर्समध्ये बदल करून सुविधा देणाऱ्या गुगलने जीमेल वापरकर्त्यांसाठी नुकतेच एक नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. सांगितलेल्या किंवा ठरवलेल्या वेळेत ई-मेल करण्याची आठवण करून देणाऱ्या या नवीन फीचरला ‘नज’ फीचर असे नाव देण्यात आले आहे. 

एखाद्या विशिष्ट ई-मेलसाठी विशिष्ट तारिख आणि वेळ ठरवून त्यानुसार तो मेल करावयाचा असल्यास, त्यासाठी हे नवीन फीचर उपयोगी ठरणार आहे. या नवीन फीचरद्वारे वापरकर्ता मेलसाठी विशिष्ट तारिख आणि वेळ सेट करून ठेवू शकतो. असे सेट केल्यास त्या तारखेला आणि त्या वेळेत तो ई-मेल पुन्हा तुमच्या इनबॉक्समध्ये दिसू लागेल आणि तो पाठवता येणार आहे. या सर्व प्रक्रियेत हे फीचर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कार्य करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 

जीमेलच्या अगदी वर उजव्या बाजूस हे नवीन ‘नज’ फीचर दिसेल. हे फीचर डीफॉल्ट ऑन राहते. परंतु सेटिंगमध्ये या फीचरसाठी असलेल्या खास सेटिंगमध्ये ते मॅन्युअली ऑफ करण्याची सेटिंगही उपलब्ध आहे. हे फीचर ऑन केल्यास त्याच्या सेटिंगनुसार काही खास ई-मेल्स तुमच्या इनबॉक्सवर दिसतील. या नवीन फीचरबरोबरच गुगलने जीमेलला एका नवीन आणि आकर्षक डिझाईनमध्ये सादर केले आहे. शिवाय ‘स्मार्ट कंपोज’ नावाचे एक नवे फीचरही दिले आहे. आणखी एक करण्यात आलेला नवीन आणि महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसतानाही वापरकर्ते जीमेल वापरू शकणार आहेत. त्यांचे काम, संदेश सिंक होऊन, इंटरनेट सुरू झाल्यावर ते डाऊनलोड होऊ शकतील.  

हे नवीन फीचर जगासमोर आणताना यासंदर्भात गुगलने एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ‘तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काही अनावश्यक आणि नको असलेले ई-मेल तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन सतत गर्दी करत असतात. या अशा नको असलेल्या मेल्सच्या गर्दीत तुमचे महत्त्वाचे ई-मेल्स गहाळ होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून हे नवीन फीचर आणले आहे. आता हे जीमेलचे नवे वैशिष्ट्य तुमची मदत करणार आहे. हे नवे ‘नज’ फिचर तुमच्या गहाळ झालेल्या मेल्सना प्रतिसाद (रिप्लाय) करण्याची आठवण वापरकर्त्यांना करेल..’, असे गुगलने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link