Next
ठाण्यात ३१ ऑगस्टला ‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळा
BOI
Tuesday, August 27, 2019 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी ३१ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘घे भरारी’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालय, नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाउन यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

ही कार्यशाळा मराठीत होणार असून, उद्घाटनासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रशासन व पत्रकारिता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी १०.४५ ते ११.४५ या वेळेत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर ‘राष्ट्रीय विकास व पत्रकारांची भूमिका’ यावर विचार मांडणार आहेत. दुपारी १२ ते एक या सत्रात आकाशवाणीचे माजी संचालक डॉ. महेश केळुस्कर हे ‘आकाशवाणी व त्यासाठी भाषेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी दोन ते तीनच्या या सत्रात ‘जनसंपर्क व सोशल मीडियाचे महत्त्व’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ एम. पी. जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. 

दुपारी तीन ते चार या वेळेत ज्येष्ठ पत्रकार, वृत्तनिवेदक मिलिंद भागवत ‘इलेक्ट्रॉनिक मीडियाचे महत्त्व’ या विषयावर बोलणार आहेत. समारोपाच्या आधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची थेट मुलाखत घेतली जाणार असून, त्यातून मुलाखतीचे तंत्र शिकायला मिळणार आहे. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर रोटरीचे कार्य व सामाजिक बांधिलकी या विषयावर बोलणार आहेत. ही कार्यशाळा पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, तसेच सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. 

नोंदणीसाठी संपर्क : आकाश ढवळ – ८२९१० ९२५११
कार्यशाळेचे स्थळ : रघुनाथ नगर, तीन हात नाक्याजवळ, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, ठाणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search