Next
कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this article:

नवी मुंबई : कोकण विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १२ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी तीन वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केली आहे.

ज्या नागरिकांना कोकण विभागातील शासनाच्या निरनिराळ्या कार्यालयांतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्यायच्या असतील, त्यांनी अशा तक्रारी लेखी स्वरूपात आवश्यक त्या पुराव्यासह प्रथमत: आपल्या जिल्हास्तरावरील भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करावी. जिल्हास्तरावरील भ्रष्टाचार निर्मूलन समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास त्यानंतर या समितीसमोर १२ फेब्रुवारीला बैठकीच्या वेळेपूर्वी दोन प्रती समक्ष द्याव्यात, असे तहसीलदार (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बैठकीविषयी :
दिवस :
मंगळवार, १२ फेब्रुवारी २०१९
वेळ : दुपारी तीन वाजता
स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, पहिला मजला, नवी मुंबई.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search