Next
अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित लॅपटॉप आता भाडेतत्वावर
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 05:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारत आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये भाड्याने ऑनलाईन उत्पादने उपलब्ध करून देणारी प्रमुख कंपनी रेंटशेरने (RentSher) नुकतेच भाड्याने देण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विस्तृत यादीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित (हाय-एन्ड) लॅपटॉपची भर घातली आहे. आयटी हब्सद्वारे होणारी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रेंटशेरद्वारे इंटेल झिऑन, ऍपल, मॅकबुक यांसारख्या शीर्ष ब्रँड्सचे लॅपटॉप्स भाड्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

चांगल्या बॅटरी लाइफसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित लॅपटॉप्स साधरणतः एक लाखापेक्षा अधिक किंमतीत उपलब्ध असतात. रेंटशेरद्वारे ग्राहक हे लॅपटॉप्स चार हजार ९९० ते १६ हजार रुपये मासिक भाडे देऊन वापरण्यासाठी घेऊ शकतात.

सर्वसाधारणपणे कोर आय३ लॅपटॉप कॉन्फिगरेशनसाठी दरमहा एक हजार ६८० रुपयांपासून भाडे आकारले जाते आणि १६ जीबी रॅमसह कोर आय७ अत्याधुनिक मॅकबुकसाठी आठ हजार ५०० रुपये भाडे आकारले जाते. या व्यतिरिक्त १२८ जीबी रॅम आणि ६०० जीबी एसएएस एचडीडीसह झिऑन ओक्टा कोर रॅक सर्व्हरसारख्या टॉप-द-लाइन मॉडेल्स दरमहा तीस हजार रुपये किंमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट दर्जाची सिस्टीम प्रदान करून रेंटशेर समाजातील सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकेल यासाठी प्रयत्नशील आहे.

आपल्या स्थापनेपासूनच रेंटशेरला लघु आणि मध्यम उद्योगांकडून लॅपटॉप आणि वर्कस्टेशन्सची मोठी मागणी मिळते आहे. स्टार्टअप जे आपली भांडवली किंमत कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. विविध प्रकल्पांवर काम करणारे, तसेच सल्लागारांना कमी किंमतीत भाड्याने उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक लॅपटॉप्सचा सर्वाधिक फायदा होत आहे.

ही उत्पादने एक दिवसापासून ते एक आठवडा, एक महिना किंवा त्याहूनही अधिक कालावधीसाठी सहज आणि परवडेबल दारात उपलब्ध होत असल्यामुळे लघु-माध्यम उद्योजकांचा ही उत्पादने भाड्याने घेण्याकडे कल वाढला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search