Next
‘क्लिअरट्रिप’ची ‘फ्लायइन’सोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, June 22 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘क्लिअरट्रिप’ या देशातील आघाडीच्या ऑनलाइन ट्रॅव्हल मंचाने सौदी अरेबियातील सर्वांत मोठे ट्रॅव्हल मंच ‘फ्लायइन’सोबत भागीदारीकेली आहे. कोणत्याही भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल अग्रीगेटरद्वारे करण्यात आलेला अशाप्रकारची ही पहिली आंतरराष्ट्रीय भागीदारी असून, यामुळे या क्षेत्रात ‘क्लिअरट्रिप’चे वर्चस्व अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्रामध्ये टेक्नो-सॅव्ही उपभोक्त्यांची संख्या येथे खूप जास्त असून, ऑनलाइन व्यवहार करण्यात ते अग्रेसर असल्याने या भागीदारीचा ‘क्लिअरट्रिप’ आणि ‘फ्लायइन’ दोघांनाही फायदा होणार आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्रामध्ये अधिक चांगले युनिट इकॉनॉमिक्स आणि संचलनाचे मोठे प्रमाण यामुळे या संयुक्त कंपनीकडे मध्य पूर्वेतील ६० टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअर असेल; तसेच या भागीदारीमुळे आजूबाजूच्या मार्केटमध्ये ‘क्लिअरट्रिप’चा आवाका आणि ग्राहक बेस वाढेल

‘क्लिअरट्रिप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट क्रायटन म्हणाले, ‘जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या साहाय्याने भारतात भक्कम स्थान स्थापित केल्यानंतर आता मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका क्षेत्रातील बाजारात शिरकाव करून आमच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेसह आम्ही पुढे जात आहोत आणि ‘फ्लायइन’च्या सोबतीने आम्ही आमच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. मजबूत ग्राहक बेस आणि समृद्ध ट्रॅव्हल ऑफरिंग असलेली फ्लायइन कंपनी त्या प्रांतातील आमच्यासाठीची स्वाभाविक भागीदार बनली आहे. आमच्या उत्पादनाचा विकास करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही एकमेकांच्या बलस्थानांचा उपयोग करू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link