Next
पुलावामा हल्ल्यानंतर भारतीयांना संतापापेक्षा दुःख अधिक
सोशल मीडियावरील सक्रियतेवरून ‘अॅम्प्लिफायडॉटएआय’चा अहवाल
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 01:39 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी आणि घातक हल्ल्याच्या बाबतीत भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली चिंता, विचार आणि प्रार्थना व्यक्त केल्या. या वेळी व्यक्त झालेल्या भावनांमध्ये संतापापेक्षा ही अधिक दुःख आढळून आल्याचा अहवाल प्रमुख आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या अॅम्प्लिफायडॉटएआयने (Amplicy.ai) दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) उपयोग करून सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.

१०० दशलक्ष फेसबुक ‘एंगेजमेंट्स’च्या (टिप्पण्या, लाइक्स, प्रतिक्रिया आणि संदेश) डेटासेटवर काम करून ‘अॅम्प्लिफाय’ने या हल्ल्याच्या आणि त्यावरील सरकारी प्रतिक्रियेच्या बातमीवर भारतीयांनी आपल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यक्त केल्या हे जाणून घेतले. मागील ३० दिवसांच्या सरसरीच्या तुलनेत हल्ल्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी एकूण वापरकर्ते सक्रिय असण्यातली वाढ १.३ पट होती ज्यात ‘दुःखी’ आणि ‘संतप्त’ भावनांचे एकत्रित प्रमाण १० पटींनी वाढले होते. टिप्पण्या आणि मेसेंजरने येणारे इनबाउंड संदेश सुमारे २.५ पटींनी वाढले. त्यापैकी ‘अॅम्प्लिफाय’च्या एआय-प्रेरित एंगेजमेंट अॅनलायझर अनुसार नकारात्मक संदेश पाच पटींपेक्षा जास्त वाढल्याचे दिसून आले.

या दरम्यान ‘दुःख’ या प्रतिक्रियेचा वापर पाचपटींनी वाढला होता, तर संतप्त प्रतिक्रेयेचा वापर दोन पटींनी वाढला होता. ‘हाहा’ प्रतिक्रियेचा वापर नेहमीपेक्षा १/६ ने, ‘वॉव’ प्रतिक्रियेचा वापर २/३ ने, तर ‘हार्ट’ प्रतिक्रियेचा वापर १/२ ने कमी झाला होता. या दुर्घटनेसंदर्भात भारतीयांना आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे वाटले. त्यामुळे फेसबुकवर प्रचंड प्रमाणात एंगेजमेंट वाढली व त्यात सार्वजनिक टिप्पण्या आणि खाजगी संदेशांचे प्रमाण खूप वाढले. रियल टाइममध्ये झालेल्या डिजिटल एंगेजमेंटच्या वाढत्या प्रमाणाचा अर्थ लावण्यात ‘एआय’ सर्वांत मोठी भूमिका बाजावेल, अशी आशा ‘अॅम्प्लिफाय’ने व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link