Next
क्रिकेटवेड्या भारतात होणार जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान
अहमदाबादमधील मोटेरा येथील मैदान ‘इडन गार्डन’ आणि ‘मेलबर्न’पेक्षाही मोठे
BOI
Tuesday, January 08, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:


अहमदाबाद : क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला, तरीही देशात सर्वांत जास्त पाहिला जाणारा हा खेळ आहे. क्रिकेटचे असंख्य चाहते असलेल्या या देशातील अहमदाबाद शहरात जगातील सर्वांत मोठे क्रिकेट मैदान उभे राहत आहे. ‘गुजरात क्रिकेट असोसिएशन’चे अध्यक्ष परिमल नथवानी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती देऊन मैदानाच्या बांधकामाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

नथवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील मोटेरा या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या या भव्य मैदानाची आसनक्षमता एक लाख १० हजार असेल. आसनक्षमतेच्या बाबतीत हे मैदान कोलकाता येथील ‘इडन गार्डन’ आणि ‘मेलबर्न क्रिकेट क्लब’ या मैदानांनाही मागे टाकणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लब मैदानाची आसनक्षमता एक लाख असून, ईडन गार्डनची ८० हजार आहे. 

६३ एकर जमिनीवर बांधण्यात येत असलेल्या या मैदानाचे काम सुरू झाले असून, या प्रकल्पासाठी अंदाजे ७०० कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. १९८२मध्ये याच जागेवर बांधण्यात आलेले मैदान पाडून २०१५मध्ये गुजरात क्रिकेट असोसिएशनने ते पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानाला ‘सरदार पटेल’ यांचे नाव देण्यात आले असून, अनेक अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे हे मैदान असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.  

मैदानाची काही ठळक वैशिष्ट्ये :
- या मैदान प्रकल्पाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असून गुजरात क्रिकेट असोसिएशन ती पूर्णत्वास नेण्याचे कार्य करत आहे. 
- लार्सन अँड टर्बो (एल अँड टी) या कंपनीला या मैदानाच्या बांधकामाचे टेंडर देण्यात आले असून, मेलबर्न क्रिकेट क्लब मैदानाच्या डिझायनिंगचे कामही याच कंपनीने केले आहे. 
- चार सुसज्ज ड्रेसिंग रूम्स, ५० रूम्सचे क्लब हाउस, ७६ कॉर्पोरेट बॉक्सेस आणि मोठा स्विमिंग पूल अशा महत्त्वाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील. 
- मैदानाच्या सुसज्ज पार्किंगमध्ये तीन हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकी पार्क करता येण्याची क्षमता आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search