Next
पुणे येथे अंध मुलांनी फोडली दहीहंडी
प्रेस रिलीज
Thursday, September 06 | 11:58 AM
15 0 0
Share this story

पुणे : दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देत केदार फ्रेंड्स सर्कल गल्ली क्रमांक चारने किष्किंधा अंधाश्रमातील मुलांना या उत्सवात सहभागी करून घेतले आणि दहीहंडी देखील त्यांच्याच हस्ते फोडण्यात आली.

नागरिकांनी या उपक्रमाला दाद दिली आणि समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता शिववंदनेने करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल केदार फ्रेंड्स सर्कल गल्ली क्रमांक चारचे आधारस्तंभ दीपक नागपुरे, संस्थापक समीर महाडिक, अध्यक्ष महेश वैद्य यांनी आभार मांडले.

सामाजिक कार्यकर्ते उमेश अण्णा चव्हाण व नगरसेवक दिकभाऊ पोटे यांची या कार्यक्रमावेळी विशेष उपस्थिती लाभली. दहीहंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार जतने, रोशन भिलारे, मंगेश खांडेकर, ओंकार वरूनकर, प्रशांत सोनवणे, संदीप कदम, प्रथमेश क्षीरसागर, मयूर पांगारे यांनी विशेष प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link