Next
‘होंडा’तर्फे पुण्यात कौशल्य विकास मोहीम
होंडा स्किल एनहान्समेंट सेंटरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 04:49 PM
15 0 0
Share this story

पुणे : तरुणांना कौशल्य विकासाचे जास्त पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील औंध येथे असलेल्या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (आयटीआय) होंडा स्किल एनहान्समेंट केंद्राचे उद्घाटन केले.

या वेळी व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे संयुक्त संचालक राजेंद्रा घुमे, औंध येथील सरकारी आयटीआयचे प्राचार्य प्रकाश सायगांवकर, ‘एचएमएसआय’चे विक्री आणि विपणन विभागाचे उपसंचालक काझुहिरो मियानो, ‘एचएमएसआय’चे विक्री आणि विपणनचे प्रादेशिक प्रमुख विवेक तलुजा उपस्थित होते.

वाहन देखभाल व दुरुस्तीचे विविध पैलू, तसेच व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे होंडा स्किल एनहान्समेंट केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी ‘होंडा’तर्फे स्थापन करण्यात आलेल्या पूर्णपणे कार्यान्वित सेवा कार्यशाळेत औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना ‘होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (ग्राहक सेवा) प्रदीप पांडे म्हणाले, ‘बीएसव्हीआय उत्सर्जन नियमांची अंतिम मुदत जवळ येत असल्यामुळे भारतीय वाहन उद्योग वेगाने बदलत आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध होतील. ‘होंडा’ आपल्या विविध सीएसआर उपक्रमांद्वारे देशभरात कौशल्य विकासाचा प्रचार करत आहे. भारतात होंडा स्किल एनहान्समेंट केंद्रांद्वारे कुशल मनुष्यबळ तयार करून आम्ही तरुणांना सक्षम करण्याचे तसेच उज्ज्वल भविष्य उभारण्यासाठी मदत करणार आहोत.’

औंध येथील सरकारी आयटीआय येथे उभारण्यात आलेले होंडा स्किल एनहान्समेंट केंद्र पुढे जाऊन विद्यार्थ्यांसाठी रोजगार निर्मितीही करणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ‘होंडा’द्वारे उमेदवारांना आपले उत्पादन कारखाने आणि वितरकांकडे संधी दिली जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link