Next
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कलाकारांची मदत
BOI
Wednesday, February 20, 2019 | 06:07 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘जैश-ए-मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेने आपल्या जवानांच्या तळावर केलेल्या हल्ल्याचा निषेध देशाच्या सर्वच स्तरांवर होत असताना बॉलीवूड सेलिब्रिटींनी या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 

या हल्ल्यात आपले ४३ जवान शहीद झाले असताना देशभरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, राजकारणी यांच्याबरोबरच बॉलीवूडचे अनेक कलाकार सरसावले आहेत. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार, रविना टंडन यांच्याबरोबरच इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सलमान खानच्या आगामी ‘नोटबुक’ या चित्रपटाच्या वतीनेही शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २२ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय अभिनेत्री रवीना टंडन हिनेदेखील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या रवीनाने आपला हा निर्णय जाहीर केला आहे. 

जवानांच्या आणि एकंदरीतच देशाच्या बाबतीत संवेदनशील असलेला अक्षय कुमार वेळोवेळी मदतीचा हात पुढे करताना दिसतो. या वेळेसही अक्षयने या शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी ‘भारत के वीर’ या अॅपच्या माध्यमातून केवळ दीड दिवसात सात कोटी रुपयांचा निधी जमा करून दिला आहे. या निधीमध्ये त्याने स्वतः पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. दरम्यान आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या टीमनेही ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. 

चित्रपट कलाकारांनी मदतीमध्ये खारीचा वाटा उचलेला असताना खेळाडूही यात मागे नाहीत. क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link