Next
‘महिंद्रा ग्रुप’ला ‘ऑर्गनायझेशन टू वॉच’ सन्मान बहाल
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महिंद्रा ग्रुपला ग्रीनबिझ ग्रुपच्या २०१९ साठीच्या वार्षिक ‘स्टेट ऑफ ग्रीन बिजनेस’ अहवालात ‘ऑर्गनायझेशन टू वॉच’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.  ‘ईपी१००’चे पहिले स्वाक्षरीकर्ता म्हणून ऊर्जा उत्पादनात दुपटीने वाढ करण्याच्या महिंद्रा ग्रुपच्या प्रयत्नांसाठी, तसेच २०४०पर्यंत कार्बानोत्सर्जन संपूर्णपणे बंद करण्यासाठी वचनबद्ध असल्याबद्दल महिंद्रा ग्रुपला हा गौरव मिळाला आहे.

अतिशय प्रतिष्ठेच्या यादीत समावेश झाल्याबद्दल महिंद्रा ग्रुपचे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर अनिर्बन घोष म्हणाले, ‘ग्रीनबिझ ग्रुपने प्रकाशित केलेल्या या मानाच्या यादीमध्ये आमचा समावेश झाला आहे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. ऊर्जा सक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी,  व्यवसाय लाभासाठी प्रयत्नांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची जोड देण्यासाठी अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. आमच्या सर्व व्यवसाय प्रक्रिया पर्यावरण पूरक असाव्यात हे आमचे उद्दिष्ट आहे.’

जगाला सध्या भेडसावत असलेल्या पर्यावरणविषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी कंपन्या कशाप्रकारे व किती प्रमाणात प्रयत्न करत आहेत, हे दर वर्षी या अहवालात १० महत्त्वाचे ट्रेंड्स व डझनभर मेट्रिक्सच्या आधारे हे तपासले जाते. हा अहवाल ‘एसअँडपी’ ग्लोबलचा भाग असलेल्या ट्रूकॉस्टसोबत सहयोगाद्वारे तयार करण्यात आला आहे.  उत्पादनांसाठी निसर्गावर अवलंबून राहण्याचे आर्थिक परिणाम काय असू शकतात हे समजून घेण्यात कंपन्या, गुंतवणूकदार, सरकारे, शिक्षणसंस्था व विचारवंतांची मदत करणारी ‘एसअँडपी’ ग्लोबल जागतिक पातळीवर आघाडीवर आहे.

ग्रीनबिझ ग्रुपचे अध्यक्ष व कार्यकारी प्रकाशक आणि अहवालाचे प्रमुख लेखक जोएल मॅकॉवेर म्हणाले, ‘या संस्था संपूर्ण उद्योगक्षेत्राला व इतरांसमोरही पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण करत आहेत. या यादीत महिंद्रा ग्रुपचा समावेश करताना व त्यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे अभिनंदन करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे.’

या वर्षीच्या अहवालातील ट्रेंड्समध्ये उत्पादने व पॅकेजिंगचा पुनर्वापर, जंगलतोड रोखण्यासाठी कॉर्पोरेट्सनी केलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ, वातावरणातील बदलांवर उपाय म्हणून शेतीमध्ये वाढ, विजेवर चालणारे ट्रक व बसेसच्या वापरात वाढ, कंपनीच्या पर्यावरण, सामाजिक वचनबद्धता व कामगिरीकडे गुंतवणूकदारांचे वाढलेले लक्ष या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.

दहा ट्रेंड्सच्या बरोबरीनेच या अहवालात ३०पेक्षा जास्त मेट्रिक्स जवळपास दोन हजार कंपन्यांना देण्यात येतात, त्यानुसार त्यांची प्रगती किंवा अधोगती तपासली जाते.  याचे निकष विविध प्रकारचे असतात. पुरवठा साखळीचे परिणाम, नैसर्गिक भांडवलाचे परिणाम, ग्रीनहाउस गॅस उत्सर्जन, हरित उत्पादनांमध्ये व बिजनेस मॉडेल्समध्ये गुंतवणूक यांचा त्यामध्ये समावेश असतो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search