Next
हिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन
नागेश शिंदे
Thursday, August 16, 2018 | 01:21 PM
15 0 0
Share this story

हिमायतनगर (नांदेड) : शहरातील नगरपंचायतीत नूतन नगराध्यक्ष कुणाल राम राठोड आणि मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०१८ रोजी ध्वजवंदन झाले. आधी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून, ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात झाला.

हिमायतनगर नगर पंचायतीवर अलीकडेच शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर हा पहिलाच स्वातंत्र्यदिन होता. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढा मोठा जनसमुदाय अगोदर कधीच नगर पंचायत ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित नव्हता, असे जाणकारांचे निरीक्षण आहे.
 
या वेळी मुख्याधिकारी नितीन बागुल, लक्ष्मण शकरगे, महावीर सेठ, श्रीश्रीमाळ, प्रथम नगराध्यक्ष अखिल अक्कलवाड, चांद सेठ, प्रभाकर अण्णा मुधोळकर, जनसेवक सरदार खान पठाण, रामभाऊ ठाकरे, अन्वर खान पठाण, ज्ञानेश्व  शिंदे, सदाशिव सातव, सावन डाके, सुरेश पळशीकर, गजानन चायल, पांडूअप्पा तुप्तेवार, इरफान खान, उदय देशपांडे, जिया खान, मुना जनावार, गोविंद बंडेवार, विजय नरवाडे, फिरोज खान, विनायक मेंडके, सुरेखाताई सातव, पंचफुलाबाई लोने, लक्ष्मीबाई भोरे, योगेश चिलकावार, बंडूभाऊ अनगुलवार, पवन सातव, सूरज दासेवार, मंगेश धुमाळे, कल्याण ठाकूर, अमोल धुमाळे, शीतल सेवनकर व सर्व नगरसेवक, नगरसेविका, गावातील प्रतिष्टित नागरिक, व्यापारी मित्रपरिवार, पत्रकार आणि नगर पंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nagesh About 185 Days ago
जय हिंद
0
0
Bandu angulwar About 185 Days ago
Super and jay hind
0
0

Select Language
Share Link