Next
‘स्टार हेल्थ’तर्फे ‘स्टार कार्डिअॅक’ योजनेत बदल
प्रेस रिलीज
Wednesday, May 30, 2018 | 12:15 PM
15 0 0
Share this story

चेन्नई : स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही देशातील पहिली आरोग्य विमा कंपनीने आपली स्टार कार्डिअॅक विमा योजना कमी प्रिमियम दरांसह नव्याने उपलब्ध केली आहे. ग्राहकांना आता त्यांच्या वयानुसार २८ ते ४० टक्क्यांनी कमी झालेल्या दरांत कार्डिअॅक योजना घेता येणार आहे.

२०१३ मध्ये ‘स्टार हेल्थ’ने पहिल्यांदा स्टार कार्डिअॅक केअर विमा योजना सादर केली होती, ज्यामध्ये हृदयरोग असलेल्या आणि बायपास शस्त्रक्रियांसह उपचार झालेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या योजने अंतर्गत हृदयाचे आजार, अपघात आणि इतर (नॉन-कार्डिअॅक) आजार समाविष्ट केले जातात. त्याचबरोबर बाह्यरुग्ण विभागातील वैद्यकीय खर्च, अपघाती मृत्यूसाठी वैयक्तिक कव्हर आदी कव्हर केले जातात. त्याशिवाय या पुनर्नूतनीकरण झालेल्या योजनेमध्ये आधीच्या ४०५ प्रक्रियांच्या तुलनेत आता सर्व प्रक्रारच्या डे केअर प्रक्रिया कव्हर केल्या जाणार आहेत.

स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे सीओओ डॉ. एस. प्रकाश म्हणाले, ‘स्टार कार्डिअॅक केअर योजना बाजारपेठेत अतिशय यशस्वी झाली होती. सादर झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत आम्ही मागणीमध्ये वाढ नोंदवली आहे. स्टार कार्डिअॅक केअरने आर्थिक वर्ष २०१७-१८च्या विक्रीत त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २७.५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ‘स्टार हेल्थ’मध्ये आम्ही कायमच ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादने विकसित करण्यावर आणि बाजारपेठेच्या गरजांनुसार त्यांमध्ये नियमित सुधारणा करण्यावर भर दिला आहे.’

‘डॉक्टर्सच रुग्णांवर उपचार करतात आणि प्रक्रिया तसेच आजाराचे विविध पैलू समजून घेतात. म्हणूनच आम्ही उत्पादन तयार करताना, आमच्या ग्राहकांना वेळेत सर्वोत्तम कव्हरेज देण्यासाठी आणि आरोग्य सेवा क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी या तज्ज्ञांना सहभागी करून घेतो,’ असेही डॉ. प्रकाश म्हणाले.

भारतामध्ये हृदयरोग केवळ ज्येष्ठांनाच नव्हे, तर मध्यमवयीन आणि तरुणांनाही होत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, दुर्देवाने लोकांना विम्याचे कवच मिळत नाही, कारण त्यांना हृदयरोग रूग्ण म्हणून ग्राह्य धरले जाते. ‘स्टार हेल्थ’ने पुढे येत ही परंपरा खंडित करण्यासाठी व या रुग्णांना कमी खर्चात हृदयरोगावर उपचारांचे कव्हर देण्यासाठी पुढे आले आहे.

‘स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स’विषयी :

स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीची आरोग्य विमा कंपनी आहे. कंपनीने बाजारपेठेतील गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी वैविध्यपूर्ण विमा उत्पादने सादर केली आहेत. त्यात कार्डिअॅक समस्या असणाऱ्यांसाठी स्टार केअर फॉर कार्डिअॅक एलिमेंट्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टार सिटीझन्स रेड कार्पेट आणि टाइप वन व टाइप टू मधुमेह असलेल्यांसाठी स्टार डायबेटीस सेफ इन्शुरन्स ही योजना उपलब्ध केलेली आहे. आरोग्याचे संरक्षण आणि प्रचार करण्याच्या हेतूने ‘स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स’ने भारतात ३०० पेक्षा जास्त शाखा कार्यालये, सात हजार ६०० नेटवर्क हॉस्पिटल्स उभारलेली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link